रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल्ल्याने वजन होतं कमी, होतात इतरही अनेक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:06 AM2022-11-18T10:06:56+5:302022-11-18T10:07:14+5:30
Soaked Chana Benefits: रोज एक वाटी भिजलेले चणे खाल्ले तर अनेक फायदे मिळू शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल्ल्याने काय फायदे होतात.
Soaked Chana Benefits: हिवाळ्यात भिजलेले चणे खाणं फार फायदेशीर ठरतात. काळे चणे जास्तीत जास्त लोक खातात. तेच काही लोक चणे रोस्ट करून खाणं पसंत करतात. तर काही लोक उकडून चणे खातात. पण चणे भिजवूनही खाल्ले जाऊ शकतात. भिजलेले चणे खाणं आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. कारण चण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, एनर्जी, आयरन, कॅल्शिअम आणि सोडिअमसारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे रोज एक वाटी भिजलेले चणे खाल्ले तर अनेक फायदे मिळू शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल्ल्याने काय फायदे होतात.
पचनक्रिया सुधारते
पचनक्रिया मजबूत करण्यासाठी तुम्ही भिजवलेले चणे खाऊ शकता. चण्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. फायबर आतड्या आणि पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतं. याने आपलं शरीर डिटॉक्स होतं आणि पोटासंबंधी समस्या दूर होतात.
हार्ट हेल्थसाठी
भिजवलेले चणे खाल्ल्याने तुमचं हृदयही निरोगी राहतं. असं होतं कारण चण्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि एंथोसायनिनि आढळतात. हे सगळे तत्व हृदय आणि रक्त वाहिका निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याशिवाय चण्यातील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमही हृदयासाठी फायदेशीर असतात.
वजन करा कमी
हिवाळा कमी करण्यासाठी सगळ्याच चांगला मानला जातो. तुम्हालाही जर वजन कमी करायची असेल तर रोज रिकाम्या पोटी भिजवलेल्या चण्यांचं सेवन करा. चण्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे रोज सकाळी भिजवलेले चणे खावे. याने तुमचं पोट जास्त वेळ भरून राहतं. याने तुम्ही ओव्हरइटिंगपासून वाचाल आणि तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहणार. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज नाश्त्यात भिजवलेले चणे खा.