डासांमुळे उद्भवणारा 'हा' व्हायरस 9 दिवसांत करू शकतो 'ब्रेन डेड'; वेळीच सावध व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:04 PM2019-09-19T12:04:38+5:302019-09-19T12:05:04+5:30
या जीवघेण्या वायरसला 'ईस्टर्न ईक्वाइन एंसेफलाइटिस' म्हणून ओळखलं जातं. वैद्यकिय भाषेमध्ये या आजारासाठी EEE अशी शॉर्ट टर्म वापरली जाते.
अमेरिकेतील मिशिगनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका निरोगी व्यक्तीला फक्त 9 दिवसांमध्येच ब्रेन डेडचा सामना करावा लागत आहे. डासांशी संबंधित असलेला एक व्हायरसमुळे असं झाल्याचं सांगितलं जात आहे. या वायरसला 'ईस्टर्न ईक्वाइन एंसेफलाइटिस' म्हणून ओळखलं जातं. वैद्यकिय भाषेमध्ये या आजारासाठी EEE अशी शॉर्ट टर्म वापरली जाते.
वायरसमुळे झालेल्या आजाराने पीडित असणारा व्यक्ती ग्रेग मॅककेनी यांचे भाऊ मार्क यांनी सांगितले की, ग्रेग 64 वर्षांचे आहेत आणि ते पूर्णपणे निरोगी आणि आनंदी आयुष्य जगत होते. परंतु, अचानक या वायरसच्या संपर्कात आल्याने फक्त 9 दिवसांतच त्यांचं ब्रेड डेड जालं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मार्क यांनी सांगितल्यानुसार, काही दिवसांपूर्वी आपल्या भावासोबत ते फार्म हाउसवर एन्जॉय करत होते. अचानक ग्रेग यांना त्रास होऊ लागला. त्याना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर्स ग्रेग यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मिशिगनच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अॅन्ड ह्यूमन सर्विसेजने मंगळवारी साउथवेस्ट मिशिगनमध्ये ईस्टर्न ईक्वाइन एंसेफलाइटिसने ग्रस्त असणारे चार रूग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. यांपैकी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर यावर्षी या वायरसने ग्रस्त असणारे 7 रूग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
यूएसमधील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशननुसार, या वायरसबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, EEE वायरस अत्यंत रेअर असून घातकही आहे. हा डासांमुळे होणारा एक वायरस आहे. प्रत्येकवर्षी या घातक वायरसमुळे 5 ते 10 लोक ग्रस्त होतात. तसेच यापैकी जवळपास 30 टक्के लोकांचा मृत्यू होतो.
EEE वायरसची लक्षणं
अचानक प्रचंड डोकेदुखी होणं, ताप येणं, थंडी वाजणं, उलट्या होणं, लक्षणांमध्ये वाढ झाल्यास व्यक्ती कोममध्येही जाऊ शकते. दरम्यान, मिशिगनमध्ये अशाप्रकारच्या केसेस एका दशकापासून समोर येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं)