महिलांच्या शरीरावर मोनोपॉजचे होणारे परिणाम अन् काही फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 04:29 PM2019-10-13T16:29:29+5:302019-10-13T16:30:09+5:30
स्त्रीची मासिक पाळी कायमची बंद होण्याच्या शारीरिक क्रियेला रजोनिवृत्ती असं म्हणतात. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण वयाच्या 45 ते 50 वर्षांपर्यंत चालू राहते. पण ही मासिक पाळी नेमकी कशी बंद होते? जाणून घेऊया सविस्तर...
स्त्रीची मासिक पाळी कायमची बंद होण्याच्या शारीरिक क्रियेला रजोनिवृत्ती असं म्हणतात. स्त्रीयांमध्ये वयाच्या 12 ते 14व्या वर्षी मासिक पाळीला सुरूवात होते, ज्याचा अर्थ स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे, असा होतो. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण वयाच्या 45 ते 50 वर्षांपर्यंत चालू राहते. पण ही मासिक पाळी नेमकी कशी बंद होते? याबाबत अनेक महिलांना माहीतच नसतं. ज्यावेळी महिलांच्या ओव्हरी किंवा अंडाशयामध्ये प्रजननासाठी आवश्यक असणारे दोन हार्मोन्स एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन तयार होणं बंद होतं. आणि सतत पाळी येणं बंद होतं त्यावेळी ही रजोनिवृत्ती किंवा मोनोपॉजची सुरुवात समजली जाते.
जास्तीत जास्त महिलांमध्ये रजोनिवृत्ती वयाच्या 45 ते 50व्या वर्षी येते. पण अनेक महिलांमध्ये 30 ते 40 व्या वर्षीच मोनोपॉज होतं. ज्यामुळे या महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. मोनोपॉज हा कोणताही आजार नसून तो महिलांच्या शरीरामध्ये घडून येणारा एक नैसर्गिक बदल आहे. ज्यानंतर महिलांमध्ये अनेक हार्मोनल चेंजेस दिसून येतात. पण जर रजोनिवृत्ती किंवा मोनोपॉज जर वेळेआधीच होत असेल तर ही फार गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
मोनोपॉजच्या स्थितीमध्ये म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. काही महिलांसाठी ही स्थिती अत्यंत सुखद असते. पण काही महिलांना मोनोपॉजनंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया कशाप्रकारे मोनोपॉजनंतर महिलांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत...
शरीरावर होणारा मोनोपॉजचा परिणाम
एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हे प्रजननाशी संबंधित फिमेल हार्मोन्स आहेत. वाढत्या वयासोबत ओवरीचं काम करण्याची क्षमता कमी होते. तसेच ओव्यूलेशन नियमितपणे होत नाही. यामुळे मासिक पाळीमध्ये अमियमितता तसेच मासिक पाळी न येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. मोनोपॉज दरम्यान अंडाशय पूर्णपणे ovulating बंद करतो. असं अंडाशयातून एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन कमी तयार होण्यामुळे होतं.
असं ओळखा मोनोपॉज किंवा रजोनिवृत्तीची वेळ आली
जर तुम्हाला मागील 12 महिन्यांपासून मासिक पाळी आली नसेल तर तुम्ही समजू शकता की, आता तुम्ही रजोनिवृत्तीच्या स्थितीमध्ये आहात. जास्तीत जास्त महिलांमध्ये रजोनिवृत्ती वयाच्या 45 ते 50व्या वर्षी येते. पण अनेक महिलांमध्ये 30 ते 40 व्या वर्षीच मोनोपॉज होतं.
रजोनिवृत्तीमुळे शरीरावर होणारे परिणाम...
- यादरम्यान महिलांना व्हजायनामध्ये ड्रायनेसची समस्या होऊ शकते.
- रजोनिवृत्तीच्या परिणामांमध्ये अनेकदा हॉट फ्लॅशचा उल्लेख केला जातो. ही एक एस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे उद्भवणारी समस्या आहे. रजोनिवृत्तीच्या काही वर्षांनंतरही जाणवू शकते.
- हॉट फ्लॅश म्हणजे, अचानक उष्णता जाणवू लागते. घाम येणं, त्वचेची चमक वाढणं यांसारख्या समस्या उद्भवतात. हॉट फ्लॅश अचानक येतात आणि हे काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपर्यंत राहतात.
- मोनोपॉजचा परिणाम महिलांच्या मूडवरही होतो. अनेकदा मूड स्विंग्सची समस्याही उद्भवते. कधी तुम्ही खुप खूश असाल तर अचानक तुम्ही चिडचिड कराल.
- मोनोपॉजचा परिणाम झोपेवरही होतो. एस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे होणारी हॉट फ्लॅशच्या समस्येचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो.
- काही परिस्थितींमध्ये मोनोपॉजचा परिणाम महिलांच्या स्मरणशक्तीवरही होतो. वाढत्या वयासोबत स्मरणशक्तीवर परिणाम होणं साधारण गोष्ट आहे. परंतु अनेकदा मोनोपॉजमुळेही असं होऊ शकतं.
- मोनोपॉजनंतर यूरिन लीक होण्याची समस्या होऊ शकते.
- मोनोपॉजचा परिणाम महिलांच्या शरीरातील हाडांवरही होतो. या कारणामुळे अनेकदा थोडीशी इजा झाली तरिही त्यांना बोन क्रॅक होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)