मासिक पाळीच्या वेदना दूर करण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 05:00 PM2019-04-09T17:00:03+5:302019-04-09T17:02:20+5:30

मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येत असतात. तसेच या दिवसांमध्ये महिलांना वेदनांचा सामना करावा लागतो. अनेक महिला या वेदांपासून सुटका करण्यासाठी पेनकिलर किंवा इतर औषधांचा आधार घेतात.

Effective 5 tips to get relief from menstrual cramps | मासिक पाळीच्या वेदना दूर करण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

मासिक पाळीच्या वेदना दूर करण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Next

मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येत असतात. तसेच या दिवसांमध्ये महिलांना वेदनांचा सामना करावा लागतो. अनेक महिला या वेदांपासून सुटका करण्यासाठी पेनकिलर किंवा इतर औषधांचा आधार घेतात. अनेकदा तर सोशल मीडियावर वेदनांपासून सुटका करण्यासाठी उपाय शोधत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का? वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ज्या पेनकिलर किंवा औषधांचा आधार घेता त्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जाणून घेऊया काही घरगुती उपायांबाबत ज्यांच्या मदतीने तुम्ही मासिक पाळीत होणाऱ्या वेदना दूर करू शकता. 

तेजपत्ता

फार कमी लोकांना माहीत आहे की, तेजपत्ता मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांव्यतिरिक्त आरोग्याशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी अनेक महिला याचा वापर करतात.

(Image Credit : The Himalayan Times)

हॉट बॅग

जर मासिक पाळीमध्ये तुमच्या पोटामध्ये खूप वेदना होत असतील तर त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी हॉट बॅगचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला हॉट बॅगने पोटामध्ये वेदना होणाऱ्या भागामध्ये शेक देणं गरजेचं असतं. 

कॅफेनपासून दूर रहा

कॅफेनचं अधिक सेवन केल्याने शरीरामध्ये अॅसिडीटीची शक्यता वाढते. यामुळेही तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून या दिवसांमध्ये खॅफेनचं सेवन करणं टाळा. 

मिठापासून लांब रहा
 
मासिक पाळीमध्ये ब्लॉटिंग होणं स्वाभाविक आहे. अशातच जर तुम्ही मासिक पाळीच्या काही दिवस आधीपासूनच मीठाचं सेवन करणं कमी कराल तर तुमच्या किडनीला जास्त पाणी मिळण्यास मदत होते परिणामी तुमची वेदनांपासून सुटका होते.

तळलेले पदार्थ खाणं टाळा

मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्या डाएटवर थोडं कंट्रोल करा. या दिवसांमध्ये तळलेले पदार्थ खाण्याऐवजी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. तसेच ताज्या फळांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

व्यायामाचा दैनंदिन रूटिनमध्ये समावेश करा

आपल्या डेली रूटिनमध्ये हलक्या एक्सरसाइजचा समावेश करा. त्यामुळे तुमची वेदनांपासून सुटका होईल. एक्‍सरसाइज केल्याने तुमची ब्लॉटिंगची समस्या दूर होईल. पीरियड्समध्य ब्लॉटिंगमुळेच वेदना होत असतात. अशातच लाइट एक्सरसाइज केल्याने मसल्स रिलॅक्स होतात. 

टिप : वरील सर्व उपाय हे घरगुती असून आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Effective 5 tips to get relief from menstrual cramps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.