कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे बेस्ट घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 10:38 AM2024-02-24T10:38:58+5:302024-02-24T10:56:01+5:30

Black Hair Tips : आम्ही तुम्हाला पांढरे झालेले केस काळे करण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस काळे, मजबूत आणि चमकदार होतील. 

Effective and easy home remedies to get rid of white hair | कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे बेस्ट घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक

कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे बेस्ट घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक

Black Hair Tips : आजकाल कमी वयातच डोक्याचे केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना होऊ लागली आहे. ज्यामुळे लोक वैतागले आहेत. अशात हे लोक यावर वेगवेगळे उपाय करतात, केमिकलचा वापर करतात पण त्यांचे केस काही काळे होत नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला पांढरे झालेले केस काळे करण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस काळे, मजबूत आणि चमकदार होतील. 

आवळा

हेअर ऑइल तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आवळ्याचा वापर करतात. तुम्हीही तुमचे केस काळे करण्यासाठी आवळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करु शकता. अर्धा लिटर पाण्यात दोन चमचे आवळा पावडर टाका आणि त्यात लिंबाचा रसही टाका. हे मिश्रण केसांवर लावा. केस काळे करण्यासाठी हा चांगला उपाय आहे. रोज आंघोळ करताना हा उपाय करा. 

तूप

जेवणात तर आपण अनेकदा तूप खातोच. तूपाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. तसेच केस काळे करण्यासाठी तूपाचा वापर केला जाऊ शकतो. जर तुम्ही आठवड्यातून एकदा तूपाने केसांची मालिश केली तर याचा चांगला फायदा होतो.

कैरी

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कैरीमुळे पांढरे झालेले केस काळे करता येतात. यासाठी तुम्हाला कच्चा आंबा आणि आंब्याच्या काही पानांची आवश्यकता आहे. कच्चा आंबा, आंब्याची पाने आणि थोडं तेल मिश्रित करा. हे मिश्रण थोडावेळ उन्हात ठेवा. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांवर लावा. 

कांदा

कांद्यामुळे भलेही तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण कांद्याचे फायदे अनेक आहेत. कांदा तुमचे पांढरे केस काळे करु शकतो. कांदा कापून तो नियमीतपणे केसांवर चोळा. हे तुम्हाला पसंत नसेल तर कांद्या पेस्ट करुनही तुम्ही केसांवर लावू शकता. 

गायीचं दूध

असे म्हणतात की,  गायीचं दूधही पांढरे केस काळे करण्याच्या उपयोगात येतं. जर गायीच्या कच्च्या दुधाने केस धुतले तर त्याचा केस काळे करण्यास फायदा होतो. 
 

Web Title: Effective and easy home remedies to get rid of white hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.