घरात हैदोस घालणाऱ्या उंदरांपासून या घरगुती उपायांनी मिळवा सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 12:25 PM2018-07-17T12:25:59+5:302018-07-17T12:26:12+5:30

खासकरून पावसाळ्यात उंदरांनी चांगलाच हैदोस घातलेला बघायला मिळतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला उंदरं पळवून लावण्याच्या काही वेगळ्या टिप्स सांगणार आहोत.  

Effective home remedies to get rid of rats | घरात हैदोस घालणाऱ्या उंदरांपासून या घरगुती उपायांनी मिळवा सुटका!

घरात हैदोस घालणाऱ्या उंदरांपासून या घरगुती उपायांनी मिळवा सुटका!

googlenewsNext

घरात उंदरांनी हैदोस घातल्यानंतर त्याचा किती त्रास होतो हे अनेकांनी अनुभवलं असेल. कितीही उपाय केले तरी काही ठिकाणांवर उंदीर पुन्हा पुन्हा येतात. खासकरून पावसाळ्यात उंदरांनी चांगलाच हैदोस घातलेला बघायला मिळतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला उंदरं पळवून लावण्याच्या काही वेगळ्या टिप्स सांगणार आहोत.  

१) पुदीना

घरात ज्या जागेतून उंदीर प्रवेश करतो त्या जागेवर पुदीन्यांचं तेल कापसाला लावून ठेवा. पुदीन्याच्या सुगंधामुळे उंदीर घरात येत नाहीत. उंदीर पळवण्यासाठी तुम्ही घरात पुदीन्याचं रोपही लावू शकता. 

२) तुरटी

उंदरांनी जिथे आपलं बीळ तयार केलं आहे त्याबाहेर तुरटीचं पावडर टाकून ठेवा. याने ते दूर पळतील. 

3) काळे मिरे

काळे मिरे पाण्यात मिश्रित करून उंदरांच्या बीळावर  ते पाणी टाका. याच्या वासाने ते दूर पळतील. 

४) कांदा

कांद्याचा दर्प फार डार्क असतो. उंदीरांना हा वास सहन होत नाहीय. त्यामुळे कांद्याचे काही तुकडे त्यांच्या बीळावर टाका.

५) केस

आपले केसही उंदीरांसाठी घातक ठरू शकतात. केस फेकण्याऐवजी ते उंदरांच्या बीळाजवळ ठेवा. उंदीर केस खाऊन मरतात. 
 

Web Title: Effective home remedies to get rid of rats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.