अॅंटीबायोटिक औषधांच्या साइड इफेक्टपासून बचाव करण्याचे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:22 AM2019-01-29T11:22:10+5:302019-01-29T11:24:36+5:30
जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कान, डोळे, घशाच्या इन्फेक्शनने ग्रस्त असाल तर डॉक्टर अॅंटीबायोटिक औषधे घेण्याचा सल्ला देतात.
जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कान, डोळे, घशाच्या इन्फेक्शनने ग्रस्त असाल तर डॉक्टर अॅंटीबायोटिक औषधे घेण्याचा सल्ला देतात. अॅंटी-बायोटिक औषधांचा वापर बॅक्टेरिअल इंन्फेक्शनच्या उपचारासाठी केला जातो. याचं सेवन केल्याने बॅक्टेरिया नष्ट केले जातात आणि त्यांचा विकासही नष्ट केला जातो. पण याचं जास्त सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर होते. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांच्या जाळ्यात तुम्ही ओढले जाता. पण अॅंटीबायोटिकचे साइड इफेक्ट काही घरगुती उपयांनी तुम्ही दूर केले जाऊ शकतात. चला जाणून घेऊ काय आहेत हे उपाय...
प्रोबायोटिक दह्याचं सेवन करा - जेव्हा तुम्ही अॅंटीबायोटिकचं सेवन करता तेव्हा तुम्हाला दही खाण्याचा सल्ला दिला जातो. या दह्यामुळे तुमचा डायरिया होण्यापासून बचाव होतो. डायरिया अॅंटीबायोटिकचा सर्वात सामान्य साइड इफेक्ट आहे. त्यामुळे दही खाल्ल्याने शरीरात लॅक्टिक अॅसिड तयार होतं आणि याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
आलं खा - आलं एक नैसर्गिक अॅंटीबायोटिक आहे. याने नुकसानकारक मायक्रोब्सला अॅंटीबायोटिकचे साइड इफेक्ट न होऊ देता नष्ट केलं जातं. आल्यामध्ये महत्वपूर्ण तत्त्व एलिसिन असतं, जे किडनी आणि लिव्हरची अॅंटीबायोटिकपासून रक्षा करतं. आहारातून आल्याचं सेवन केल्यास शरीरातील सर्व विषारी तत्त्व नैसर्गिक पद्धतीने बाहेर पडतात. तुम्ही आलं चहाच्या रूपातही सेवन करू शकता.
पाणी प्या - औषधांमुळे तोंड कोरडं पडतं. तसेच अॅंटीबायोटिकच्या साइड इफेक्टमुळे डायरिया, उलटी यांसारख्या समस्याही होतात. याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यावे. तसेच हिरव्या भाज्या आणि फळांचंही सेवन करावं. याने शरीरातील पाणी नियंत्रित राहतं.
ब्रेड, डेअरी उत्पादनांचं सेवन करा - अॅंटी-बायोटिकच्या साइड इफेक्टपासून बचाव करण्यासाठी तुम्ही डेअरी उत्पादने, क्रेकर आणि ब्रेड यांचं सेवन करायला हवं. सोबतच जेव्हा तुम्ही अॅंटी-बायोटिकचं सेवन करत असाल तेव्हाही याचं सेवन करावं. हे सहजपणे पचतात आणि पचनक्रियेलाही आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही लवकर बरे होऊ शकता.