पावसाच्या दिवसात का वाढतो किडनी डॅमेजचा धोका? जाणून घ्या कारण आणि बचावाचे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:24 AM2024-07-29T11:24:46+5:302024-07-29T11:25:39+5:30
Kidney Care Tips In Monsoon : या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, डायरिया, ताप यासोबतच किडनीचं आरोग्यही धोक्यात येतं. जर योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर किडनीचा गंभीर आजारही होऊ शकतो.
Kidney Care Tips In Monsoon : पावसाळ्यात लोक वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होतात. कारण सगळीकडे चिखल, घाणं, डास, माश्या, दूषित पाणी असतं. वातावरण बदल झाल्याने इम्यूनिटीही कमजोर होते. अशात या दिवसात इन्फेक्शन होऊन अनेक आजारांचा धोका अधिक असतो. या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, डायरिया, ताप यासोबतच किडनीचं आरोग्यही धोक्यात येतं. जर योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर किडनीचा गंभीर आजारही होऊ शकतो.
पावसाळ्यात अनेकांना एक्यूट किडनी इन्जरीचा धोका असतो. याचं कारण म्हणजे लोकांचं दूषित पाणी आणि अन्नाच्या संपर्कात येणं. या दिवसात बॅक्टेरिअल इन्फेक्शन लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. ज्यामुळे किडनी डॅमेज होण्याची शक्यता असते. तसेच पावसाळ्यात डेंग्यू, टायफाइड, डायरिया, हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस बी चा जास्त धोका असतो. या आजारांमुळेही किडनीला धोका वाढतो.
डॉक्टरांनुसार, पावसाळ्यात कोणत्याही आजाराची लक्षणं दिसल्यावर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. हे ध्यानात ठेवा की, वेळीच उपचार केले तर किडनी फेल होण्यापासून इतरही आजारांचा धोका टाळता येतो. पावसाळ्यात किडनी निरोगी ठेवण्यासाठी खालील गोष्टी करू शकता.
काय घ्याल काळजी?
तरल पदार्थांच अधिक करा सेवन
किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी आणि इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी तुम्हाला पाणी व इतर तरल पदार्थांच अधिक सेवन करावं लागेल. हेही लक्षात ठेवा की, पावसाळ्यात पाणी उकडून कोमट करून प्यावं. त्याशिवाय तुम्ही फ्रूट ज्यूसचं आणि छाससारख्या पेय पदार्थांचं अधिक सेवन करू शकता.
हातांची स्वच्छता
साचलेल्या पाण्यात स्वीमिंग करणं किंवा ते पाणी पिणं टाळा. तसेच हात सतत साबणाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवावे. डासांना रोखण्यासाठी काही केमिकल्सचा वापर करा. जेणेकरून डासांपासून पसरणारे आजार रोखता येतील.
अन्न चांगलं शिजवून खा
पावसाच्या दिवसात खाद्य-पदार्थांना कीड लागण्याची शक्यता असते. त्यामुळे यादरम्यान इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी खाण्याचे पदार्थ चांगले धुवा आणि चांगले शिजवा. हा नुकसानकारक बॅक्टेरिया मारण्याचा चांगला उपाय आहे.
आजारी लोकांपासून दूर रहा
आजारी लोकांच्या संपर्कात येण्यापासून टाळा. लसीकरण केल्यास तुम्हाला या आजारांपासून वाचण्यास मदत मिळेल.
कोणत्याही लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष
जर तुम्हाला किडनीसंबंधी कोणतीही समस्या असेल, तर कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणं दिसताच वेळीच डॉक्टरांडे जा. हे लक्षात ठेवा की, किडनी फार नाजूक अवयव आहे. त्यामुळे इन्फेक्शनपासून वाचवण्याचा प्रयत्न करा.