लहान मुलांची वाढत नसेल उंची तर 'हे' नैसर्गिक उपाय करा ट्राय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 11:33 AM2019-06-19T11:33:41+5:302019-06-19T11:39:32+5:30

दिवसेंदिवस बिघडती लाइफस्टाईल आणि चांगला आहार मिळत नसल्याने लहान मुलांचा शारीरिक विकास वेगाने प्रभावित होत आहे.

Effective ways to increase height of children | लहान मुलांची वाढत नसेल उंची तर 'हे' नैसर्गिक उपाय करा ट्राय!

लहान मुलांची वाढत नसेल उंची तर 'हे' नैसर्गिक उपाय करा ट्राय!

googlenewsNext

(Image Credit : Medical News Today)

दिवसेंदिवस बिघडती लाइफस्टाईल आणि चांगला आहार मिळत नसल्याने लहान मुलांचा शारीरिक विकास वेगाने प्रभावित होत आहे. याच कारणामुळे लहान मुलींची उंची सुद्धा योग्य पद्धतीने वाढत नाही. वयाच्या मानाने लहान मुला-मुलींची उंची कमीच राहते. तेच अनेकदा उंची तर कमी असतेच सोबतच वजनही जास्त असतं. यामागे एक नाही तर अनेक कारणे असतात. पण काही सवयींवर लक्ष देऊन आणि काही नैसर्गिक उपाय उपाय फॉलो करून तुम्ही तुमच्या लहान मुलांची उंची वाढवू शकता. 

(Image Credit : 1mg)

उंची कमी असण्यामागे भलेही आनुवांशिक किंवा मेडिकल कारण असेल, पण योग्य वेळेत उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. चला जाणून घेऊ उंची वाढवण्याचे काही नैसर्गिक उपाय.

सर्वातआधी आहारात करा सुधार

(Image Credit : The Conversation)

उंची वाढवण्यासाठी सर्वातआधी गरजेचं आहे की, लहान मुलांचा आहार हा न्यूट्रीएंट्सने भरपूर असावा. त्यांच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, कॅल्शिअम, झिंक, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरसचं असणं फार गरजेचं आहे. त्यांना जास्तीत जास्त प्रोटीन द्या, जसे की, चिकन, पनीर, सोयाबीन, फिश, अंडी. यासोबतच हिरव्या भाज्या, सलाद आणि बीन्सचा सुद्धा समावेश करा. त्यांच्या दुधासोबतच त्यांना बदाम, शेंगदाणे, वेगवेगळी फळंही खायला द्या.

स्ट्रेचिंग अ‍ॅन्ड सायकलिंग

(Image Credit : Sustrans)

लहान मुलांना फिजिकली अ‍ॅक्टिव ठेवणं सुरू करा. त्यांना स्ट्रेचिंग करायला सांगा आणि सायकलिंग सुद्धा करायला सांगा. त्यासोबतच त्यांना अ‍ॅरोबिक्स, टेनिस, क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलसारखे खेळण्यास प्रोत्साहन द्या. तसेच खांबाला लटकण्याची सवयही त्यांना लावा.

रोज योगाभ्यास

(Image Credit : Udemy)

रोज त्यांच्या सूर्यनमस्कार करून घ्या. योगाभ्यास केल्याने त्यांचे मसल्स फ्लेक्झिबल होतील आणि स्ट्रेचिंगमुळे उंची वाढण्याचीही शक्यता अधिक असते. तसेच उंची वाढवण्यास त्रिकोणासन, भुजंगासन, सुखासन, वृक्षासन, नटराजासन ही आसने सुद्धा फायदेशीर ठरतात.

योग्य पोश्चर

(Image Credit : ACTIVEkids)

लहान मुलांचं पोश्चर योग्य असणं फार गरजेचं आहे. कारण अनेकदा पोश्चर चुकीचा असल्याने हाडेही प्रभावित होतात. त्यामुळे त्यांचा उठण्या-बसण्याची आणि उभे राहण्याची पद्धत यावर लक्ष द्या. जेणेकरून त्यांचं पोश्चर योग्य होईल आणि उंची कमी होणार नाही.

चांगली झोपही महत्त्वाची

(Image Credit : MattressHelp.org)

लहान मुलांना लागलेली मोबाइल आणि टीव्हीची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण अनेकदा लहान मुलं झोपेकडे दुर्लक्ष करून मोबाइल बघत बसतात. त्यामुळे त्यांच्यात हार्मोनचं बॅलन्स बिघडतं. अनेकदा तर पिट्यूरिटी ग्लॅंड सुद्धा या हार्मोन्समुळे प्रभावित होते. 

(टिप : वरील लेखात देण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ माहितीसाठी देण्यात आले आहेत. याकडे प्रोफेशनल सल्ला म्हणून बघता येणार नाही. वरील कोणत्याही टिप्स फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Web Title: Effective ways to increase height of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.