साखर खाणं टाळताय, जाणून घ्या साखर खाणं बंद केल्याचे परीणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 03:09 PM2019-11-26T15:09:28+5:302019-11-26T15:16:44+5:30

साखर ही सर्व पदार्थामध्ये उपयोगी मानली जाते. कारण साखर ही पचनास सहाय्य करते. साखर शरीरात ऊर्जा निर्माण करते.

Effects of avoid sugar in take | साखर खाणं टाळताय, जाणून घ्या साखर खाणं बंद केल्याचे परीणाम

साखर खाणं टाळताय, जाणून घ्या साखर खाणं बंद केल्याचे परीणाम

googlenewsNext

(Image credit-Food Navigator)

साखर ही सर्व पदार्थामध्ये उपयोगी मानली जाते. कारण साखर  पचनास सहाय्य करते. साखर शरीरात ऊर्जा निर्माण करते. असे असले तरी साखरेचे अनेक दुष्परिणामही आहेत. साखरेच्या अतिसेवनाने मधुमेह, लठ्ठपणा, डोकेदुखी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. साखरेचे शरीरातील प्रमाण जास्त असण्याला चहा, कॉफी यांसारखे काही पदार्थ कारणीभूत आहेत. वजन कमी करण्याच्या उद्देशाने अनेक लोक हे मिठाई  तत्सम गोड पदार्थांचे सेवन करणे टाळतात. बरेचसे लोक ग्रीन टी ला प्राधान्य देताना दिसून येतात. या सगळ्यात अतिशय कमी प्रमाणात साखर शरीराला मिळते. साखर जास्त खाल्ल्याने आपण जाड होऊ शकतो या भितीने किंवा नाईलाजाने आपण साखरेचे सेवन थांबवतो. 

(Image credit-Utica phoenix)

साखर खाणे पुर्णपणे बंद केल्यास या परीणामांचा सामना करावा लागेल.


१) साखर कमी केल्याने शांत झोप लागते, याऊलट साखरेचे प्रमाण अधिक झाल्यास निद्रानाशाचा सामना करावा लागतो.
२) साखरेचे अतिसेवन केल्याने जळजळ आणि श्वासोशच्छवास घेण्यास त्रास  होणे. अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

(Image credit-Mobihealth)

३) साखरेचे सेवन कमी केल्यास स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
४) साखर खाणे टाळल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते.


५) साखरचे सेवन कमी केल्यास  मधुमेह यांसारख्या आजारापासून लांब राहता. येऊ शकते.
६) साखर खाणे कमी केल्यास सांधेदुखी तत्सम वेदना दूर होतात.


७) साखर खाणे बंद केल्यास पोट आणि आतडे यांना चांगल्याप्रकारे अन्न पचण्यास मदत होते. 
८) चेहऱ्यावरील  डाग, मुरुम घालवण्यासाठी वेगळे उपाय करण्याची गरज भासणार नाही. साखर कमी केल्यास त्वचेत विलक्षण फरक दिसून येईल.

(image credit- medi Beaute)

९) साखर खाणे कमी केल्यास हृदय अधिक चांगल्याप्रकारे काम  करु शकेल. हृदय हे शरीरातील संवेदनशील अवयव आहे.. त्यामुळे त्याची अतिरीक्त काळजी घेणे गरजेचे आहे.
१०) साखरेचे अतिसेवन केल्यास वजन वाढून लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. 

Web Title: Effects of avoid sugar in take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.