'या' कारणामुळे तारुण्यातचं दिसू लागाल म्हातारे, वेळीच जाणून घ्या बचावाच्या सोप्या टिप्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 05:11 PM2021-09-22T17:11:25+5:302021-09-22T17:12:10+5:30
सध्याच्या तरुण पिढीला अनेक पातळ्यांवर मानसिक तणावाचा (Stress) सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबरोबर त्यांचे शारिरीक आरोग्यही बिघडते. त्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव हा त्यांच्या त्वचेवरही (Skin) होतो.
आपण वयाने कितीही तरुण असलो तरी आजकालच्या जीवनशैलीमुळे तारुण्य काही चेहऱ्यावर टिकत नाही. चेहऱ्यावर (Face) ग्लो दिसावा म्हणून अनेक तरुण तरुणी अनेक गोष्टी करतात. मात्र, त्यानंतरही काही फरक पडत नसल्याची तक्रार अनेकजण करताना दिसतात. मात्र यासाठी मुळ कारणावर उपचार केला पाहिजे हेच मुळात अनेकांना कळत नाही. आपल्या त्वचेवरचा ग्लो हरवण्यामागचं मुळ कारण आहे मानसिक तणाव.
सध्याच्या तरुण पिढीला अनेक पातळ्यांवर मानसिक तणावाचा (Stress) सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबरोबर त्यांचे शारिरीक आरोग्यही बिघडते. त्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव हा त्यांच्या त्वचेवरही (Skin) होतो. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर तणावामुळे ड्रायनेस, रिंकल्स, एक्ने आणि पिंपल्स यायला लागतात. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्याही पडतात.
ज्यावेळी आपण मानसिक तणावातून जात असतो. त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर याचे काही वाईट परिणाम होत असतात. जसे की आपण तणावात असताना आपल्या शरिरातील हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्याच्या विपरित परिणाम हा आपल्या त्वचेवर होतो. त्याचबरोबर आपण नेहमी कामात असताना आपल्या चेहऱ्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे चेहरा स्वच्छ राहत नाही, आणि परिणामी त्यामुळे चेहरा खराब होतो. जेव्हा आपण तणावात असतो त्यावेळी आपल्या शरिरातील कॉटिजॉल नावाचे हार्मोन्स बाहेर पडतो. त्यामुळे चेहरा चिकट होतो. त्यातून एक्ने होण्याची दाट शक्यता असते.
काही संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो, तेव्हा झोप नीट होत नाही, त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या खालचा भाग काळा पडायला लागतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे तेज कमी होते. या तणावाचा प्रभाव हा आपल्या त्वचेच्या हायड्रेशन आणि नॅचुरल नॅरिशमेंटवरही पडतो. त्यामुळे चेहऱ्यावरील मऊपणा कमी होऊन त्वचा खराब व्हायला लागते. त्याचबरोबर मानसिक तणावामुळे आपल्या डोक्यावरील केसगळती वाढते. त्यामुळे टक्कल पडण्याचाही धोका संभवतो.