अंडरवेअरसंबंधी 'या' ७ गोष्टी पुरूषांना माहीत असल्याच पाहिजेत, नाही तर बसाल बोंबलत! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 11:27 AM2020-01-09T11:27:19+5:302020-01-09T11:28:14+5:30

अंडरवेअरला फार कुणी तेवढं महत्व देत नव्हतं जेवढं इतर कपड्यांना दिलं जातं. पण आता ग्लॅमराइज होत असलेल्या समाजात अंडरविअरच्या पेहरावात आणि निवडीत बराच बदल बघायला मिळतो.

Embarrassing underwear questions every men should know | अंडरवेअरसंबंधी 'या' ७ गोष्टी पुरूषांना माहीत असल्याच पाहिजेत, नाही तर बसाल बोंबलत! 

अंडरवेअरसंबंधी 'या' ७ गोष्टी पुरूषांना माहीत असल्याच पाहिजेत, नाही तर बसाल बोंबलत! 

googlenewsNext

अंडरवेअरला फार कुणी तेवढं महत्व देत नव्हतं जेवढं इतर कपड्यांना दिलं जातं. पण आता ग्लॅमराइज होत असलेल्या समाजात अंडरवेअरच्या पेहरावात आणि निवडीत बराच बदल बघायला मिळतो. काही बाबतीत अंडरवेअरचा संबंध आरोग्याशी जोडता येतो. पण तरी सुद्धा अंडरवेअर म्हटलं की, दबक्या आवाजात त्याबाबत बोललं जातं. पण अंडरवेअरसंबंधी काही प्रश्न पुरूषांनी जरूर विचारले पाहिजेत.

काय आहेत ते प्रश्न?

अंडरविअर प्रत्येक रंग, डिझाइन आणि साइजमध्ये मिळतात. जगभरात अंडरविअरचा बाजारही वाढला आहे. अंडरवेअर कुणी खरेदी करत नाही असं शोधूनही सापडणार नाही. पण तरी सुद्धा बरेच लोक याबाबत जास्त काही बोलत नाहीत. चला जाणून घेऊ असे काही प्रश्न जे विचारण्यात अनेकजण अडखळतात.

दोन दिवस एकच अंडरवेअर घालणे किती वाईट?

दोन दिवस लागोपाठ एकच अंडरवेअर घातली जाऊ शकते. याने आरोग्याला काही फार नुकसान होत नाही. जर तुम्हाला दिसत असेल की, अंडरवेअर स्वच्छ आहे तर तुम्ही पुन्हा घालू शकता. पण जर तुम्हाला त्वचेसंबंधी काही समस्या असेल किंवा तुम्हाला जास्त घाम येत असेल तर अंडरवेअर रोज बदलली पाहिजे. असं केलं नाही तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं.

फॅब्रिकने काही फरक पडतो का?

होय नक्कीच. अंडरविअरच्या फॅब्रिकचा तुमच्या आरोग्यावर प्रभाव पडतो. सामान्यपणे कॉटनच्या मुलायम कापडाच्या अंडरवेअर वापरण्याचा सल्ला दिला जातो. याने तुम्हाला येणारा घाम सुकतो आणि हवाही खेळती राहते. काही खेळाडूंना सिंथेटिक आणि पॉलिएस्टरच्या फॅब्रिकपासून तयार अंडरवेअर घालणं सहज वाटतं.

थॉन्गमध्ये वर्कआउट करणं योग्य आहे का?

याचं उत्तर होय असं आहे. यावर मुळात कमीच रिसर्च झाले आहेत. जेव्हा तुम्ही ट्रेडमिलवर एक्सरसाइज करताना थॉन्ग घाललेले असतात तेव्हा थोडं लक्ष देण्याची गरज असते. कारण तुम्हाला व्हजायनल किंवा यीस्ट इन्फेक्शन असेल तर एक्सरसाइज दरम्यान थॉन्ग घालणे योग्य नाही. कारण यावेळी थॉग्न इकडे-तिकडे सरकण्याची भिती असते. ज्याने बॅक्टेरिया पसरू शकतात.

बॉक्सर्स किंवा ब्रीफ्स काय जास्त चांगलं?

फॅशन आणि कम्फर्टला थोडावेळ बाजूला ठेवा. या दोन्हींबाबत चर्चा ही होते की, यांनी स्पर्म प्रॉडक्शनवर काही प्रभाव पडतो का? रिसर्च सांगतात की, स्पर्म प्रॉडक्शनमध्ये अधिक तापमानाची भूमिका असते. आणि अंडरवेअर घातल्याने असंच होतं.

जर अंडरविअर वापरलीच नाही तर?

(Image Credit : pixabay.com)

एका सर्व्हेनुसार, एक चतुर्थांश अमेरिकन कधी-कधी विना अंडरविअर घालताच बाहेर पडतात. एक्सरसाइज दरम्यान जर तुमचे कपडे फिट असतील आणि तुम्हाला त्वचेसंबंधी काही समस्या नसेल तर तुम्ही अंडरवेअर वापरली नाही तरी चालेल.

कशी असावी अंडरविअर?

(Image Credit : blog.nowthatslingerie.com)

जर अंडरवेअर स्वच्छ आणि कोरडी असेल तर दुसऱ्या दिवशीही वापरता येऊ शकते. जर तुम्हला त्वचेसंबंधी समस्या असेल किंवा घाम जास्त येत असेल तर इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी धुतलेली अंडरवेअर वापरा. एक्सरसाइज वेळी अंडरवेअरची निवड विचार करून करा. कॉटनची आणि तुम्हाला सहज वाटेल अशी अंडरवेअर वापरावी. अंडरवेअरसाठी जास्त फॅशनचा विचार करू नका, तशीही ती दिसत नाही.


Web Title: Embarrassing underwear questions every men should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.