तणावाने घालवाल नोकरी..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2016 05:24 PM2016-12-07T17:24:22+5:302016-12-07T17:24:22+5:30
सध्याच्या धकाकीच्या जीवनात वाढलेल्या ताण-तणावामुळे आज प्रत्येकाला काहीना काही आजार जडलेला आहे. त्यातच वजन वाढणे, उच्च रक्तदाब तसेच पुरुषत्व कमी होणे आदी समस्या निर्माण होत असल्याचे हे आपणास माहित आहे, मात्र तणावाचा वाईट परिणाम तुमच्या करिअरवरही दिसून येतो, म्हणजेच तणावामुळे आपण आपली नोकरीदेखील घालवू शकतो. हे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे.
स ्याच्या धकाकीच्या जीवनात वाढलेल्या ताण-तणावामुळे आज प्रत्येकाला काहीना काही आजार जडलेला आहे. त्यातच वजन वाढणे, उच्च रक्तदाब तसेच पुरुषत्व कमी होणे आदी समस्या निर्माण होत असल्याचे हे आपणास माहित आहे, मात्र तणावाचा वाईट परिणाम तुमच्या करिअरवरही दिसून येतो, म्हणजेच तणावामुळे आपण आपली नोकरीदेखील घालवू शकतो. हे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे.
संशोधकांनी हे संशोधन ७८ लोकांवर केले असून, या सर्व लोकांवर तणावादरम्यान असलेला त्यांच्या हार्मोनची पातळीही तपासली गेली. तसेच त्यांना आॅफिसमध्ये दिली गेलेली जबाबदारी आणि त्यावर त्यांचा परफॉर्मन्सही तपासला गेला. पण हे संशोधन केवळ पुरुषांवरच करण्यात आले. कारण महिला त्यांच्या तणावाचा कामावर परिणाम होऊ देत नाहीत, असे समजले.
जेव्हा आपली तणावाची पातळी वाढत जाते, तेव्हा शरीरातील टेस्टोसटेरोन कमी होत जाते आणि कॉर्टिसोलची पातळी वाढत जाते. याचा मानसिक स्थितीवर परिणाम होतो. म्हणजेच तणाव वाढल्यावर पुरुष आपले आॅफिसचे काम व्यवस्थित पद्धतीने करू न शकल्याचे समोर आले. तणावादरम्यान पुरुषांच्या नेतृत्वगुणांमध्ये पण कमतरता दिसून येते.
तणावापासून मुक्ततेसाठी काय कराल?
तणावादरम्यान आपले मानसिक संतुलन नीट ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच पूर्ण झोप घेणेही आवश्यक आहे. सुट्टी घेऊन कामातून थोडा ब्रेक घ्या. तसेच कुठेतरी परिवार अथवा मित्रमैत्रीणींसोबत फिरायला जाणे उत्तम!