उपाशीपोटी 'या' पाच गोष्टी कराल तर सावधान! चांगलेच महागात पडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 04:46 PM2021-05-09T16:46:07+5:302021-05-09T16:58:22+5:30
सध्याच्या धावपळीच्या जीवनात वेळच्यावेळी खाण्याकडे दुर्लक्ष केले जाते. काहीवेळा काही कामे उपाशीपोटी (HUNGER) केली जातात. अन् हीच गोष्ट आरोग्यासाठी नेमकी घातक (DENGEROUSE)आहेत. त्यामुळेच आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या उपाशीपोटी मुळीच करू नये
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळच्यावेळी खाण्याकडे दुर्लक्ष होत जाते. ऑफिसची कामे, एखाद्या सिरिअलचा भाग चुकू नये म्हणून किंवा मुलांकडे लक्ष द्यायचे आहे म्हणून आता जेवू, नंतर खाऊ अशी चालढकल करत भूक मारली जाते. भूकेकडे (HUNGER) दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी हाणीकारक आहेच, परंतू याच उपाशीपोटी (Empty stomoch)राहण्याचे अन्य तोटेही आहेत, जे तुमच्या नात्यांसाठी किंवा कार्यक्षमतेसाठी धोक्याचे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही उपाशीपोटी असल्यास टाळाय़ला हव्यात...
उपाशीपोटी निर्णय घेणे घातक- ज्यावेळी आपल्याला भूक लागते तेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. नेदरलँड्सच्या युट्रेच विद्यापीठाच्या संशोधन कर्त्यांचे असे म्हणने आहे की उपाशी पोटी आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो. असे निर्णय चुकण्याची शक्यता असते.
व्यायाम करणे- काही जणांना असा गैरसमज असतो की उपाशीपोटी व्यायाम करणे फायद्याचे असते. पण सावधान! असा प्रकार करू नका. उपाशीपोटी व्यायाम केल्याने तुम्हाला व्यायाम करताना इजा होण्याची शक्यता असते. तसेच व्यायम करताना तुमच्या शरीरातील उर्जा कमी पडू शकते. त्यामुळे कोणताही व्यायाम करण्याआधी हलकंफुलकं खाणे हेच उत्तम आहे.
जोडीदाराशी वाद घालणे- उपाशीपोटी खुप राग येतो. त्याचमुळे या दरम्यान आपल्या जोडीदाराशी अजिबात वाद घालून नये. तुमच्या मनातही नसेल पण भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही असे काहीतरी बोलाल ज्यामुळे पुढे तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.
तिखट खाणे- उपाशीपोटी अजिबात तिखट खाऊ नका. यामुळे पोटात जळजळल्यासारखे होईल. जर तुम्हाला तिखट खाण्याची आवड असेल तर उपाशीपोटी आधी साधी न्याहरी घ्या आणि नंतर तुमच्या आवडीचे मसालेदार पदार्थ खा.
खरेदी करणं- उपाशी पोटी खरेदी करताना अनेक अनावश्यक गोष्टींची खरेदी केली जाऊ शकते. उपाशी असल्याने गोड पदार्थ, मिठाई, कार्बोहायट्रेड युक्त खाद्य इत्यादी खरेदी करण्याच्या शक्यता जास्त आहेत.