जगात दरवर्षी होणाऱ्या ९० लाख लोकांच्या अकाली मृत्यूचं कारण पर्यावरण प्रदूषण - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 10:17 AM2019-03-14T10:17:25+5:302019-03-14T10:22:20+5:30

जगभरात पर्यावरण प्रदूषण किती आणि कशाप्रकारे किंवा त्यांचा जगण्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे सतत समोर येत असतं.

Environment damage causes 90 lakh global deaths says global environment outlook report | जगात दरवर्षी होणाऱ्या ९० लाख लोकांच्या अकाली मृत्यूचं कारण पर्यावरण प्रदूषण - रिसर्च

जगात दरवर्षी होणाऱ्या ९० लाख लोकांच्या अकाली मृत्यूचं कारण पर्यावरण प्रदूषण - रिसर्च

Next

(Image Credit : Wired UK)

जगभरात पर्यावरण प्रदूषण किती आणि कशाप्रकारे किंवा त्यांचा जगण्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे सतत समोर येत असतं. असाच एक संयुक्त राष्ट्राचा रिपोर्ट समोर आला आहे. यानुसार जगभरातील पर्यावरण प्रदूषणामुळे दरवर्षी ९० लाख लोकांचं अकाली निधन होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल एन्वायर्नमेंट आउटलुक सीरिजमध्ये साधारण ६ वर्षांपर्यत रिसर्च केला गेला. ७४० पानांच्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जगभरात एक चतुर्थांश अकाली होणारे मृत्यू आणि आजार हे प्रदूषण आणि पर्यावरण बिघडल्यामुळे होत आहेत. 

संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट जारी करत इशारा दिला आहे की, जर अजूनही सर्व देशांना एकत्र येऊन पर्यावरण वाचवण्यासाठी कठोर पावले उचलली नाही तर आशिया, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील शहरं व क्षेत्रात २०५० पर्यंत लाखो लोकांचं अकाली निधन होऊ शकतं. 

दुषित पाण्याने १४ लाख लोकांचा मृत्यू

या रिसर्चमध्ये ७० देशांच्या २५० वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सांगितले की, गरीब आणि श्रीमंतर देशांमध्ये दरी आणखी खोल होत आहे. वस्तूंचा अधिक वापर, प्रदूषण, अन्नाची नासाडी, गरीबांमध्ये आजारही वाढत आहेत. 

रिपोर्टनुसार, या मृत्यूंचं कारण आहे शहरांमध्ये होत असलेलं गॅसचं उत्सर्जन, दुषित पाणी आणि पर्यावरणाची हानी करणे. ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन वाढल्याने वेळेआधीच कुठे दुष्काळ तर कुठे पुराची स्थिती निर्मात होत आहेत. त्यासोबतच समुद्रातील पाण्याची पातळी वाढून वादळ येण्याची शक्यताही अधिक वाढत आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, अन्नाची नासाडी रोखून ग्रीन हाऊस गॅसमध्ये ९ टक्के घट करता येऊ शकते. 

तसेच या शोधातून समोर आले आहे की, स्वच्छ पाण्याच्या अभावामुळे दरवर्षी १४ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. याने डायरिया आणि इतरही इन्फेक्शनचे आजार पसरत आहेत. हे आजार रोखले जाऊ शकतात. समुद्रात वाढत असलेले रसायने आरोग्याला हानी पोहचवत आहेत. घरे बांधण्यासाठी जंगलांची कत्तल वाढत आहे. 

रिपोर्टनुसार, केवळ एअर पॉल्यूशनने दरवर्षी ६० ते ७० लाख लोकांचा मृत्यू होत आहे. खाद्य उत्पादनात वाढलेला अॅंटीबायोटिकचा प्रयोग सुपरबगला ड्रग रेसिस्टेंट करत आहे. जे अकाली होणाऱ्या निधनाचं एक मोठं कारण आहे. 

२०१५ मध्ये पॅरिस जलवायु करारांदरम्यान प्रत्येक देशाने गॅसच्या उत्सर्जनात कमतरता आणण्यासोबतच जगातील तापमान १.५ डिग्री सेंटग्रेड करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण यादरम्यान प्रदूषण, जंगलांची कत्तल आणि बदलती खाद्यसंस्कृती याबाबत खोलवर विचार करण्यात आला नाही. 

Web Title: Environment damage causes 90 lakh global deaths says global environment outlook report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.