कामाच्या मधे घेत रहा छोटे छोटे ब्रेक, दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा धोका - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:41 AM2024-11-05T11:41:24+5:302024-11-05T11:42:10+5:30
Sitting Side Effects : रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, रोज ८.५ तास आणि आठवड्यातून ६० तास, ऑफिस, घरी किंवा प्रवासादरम्यान तुम्ही सतत बसत असाल तर वेळेआधी तुम्ही म्हातारे होऊ शकता.
Sitting Side Effects : वेळेआधीच म्हातारे होण्याची कारणे आणि त्यांबाबतचे वेगवेगळे रिसर्च नेहमीच समोर येत असतात. ज्यात सांगण्यात येतं की, लोकांची लाइफस्टाईल किती चुकीची आहे आणि त्यांनी निरोगी जीवन जगण्यासाठी काय करावं. एका नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, रोज ८.५ तास आणि आठवड्यातून ६० तास, ऑफिस, घरी किंवा प्रवासादरम्यान तुम्ही सतत बसत असाल तर वेळेआधी तुम्ही म्हातारे होऊ शकता आणि सोबतच तुम्हाला अनेक आजारांचा धोकाही राहतो.
या रिसर्चमधून एक महत्वाची बाब समोर आली की, कमी वयात किंवा २० मिनिटे पायी चालणे अशा मध्यम रूटीनने तुम्ही याचा प्रभाव कमी करू शकता. तसेच जर तुम्ही रोज ३० मिनिटे धावणे किंवा सायकल चालवणे अशा अॅक्टिविटी करूनही मदत मिळवू शकता.
अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडे बोल्डरमधील प्रोफेसर चंद्रा रेनॉल्ड्स यांनी सांगितलं की, "दिवसभर कमी बसणं, जास्त व्यायाम करणं या दोन्ही गोष्टींच्या मदतीने तुम्ही कमी वयातच म्हातारे होण्याचा धोका कमी करू शकता".
अभ्यासकांच्या टीमने ३३ वयोगटाच्या १ पेक्षा अधिक लोकांवर हा रिसर्च केला. तसेच यात ७३० जुळ्या मुलांचाही समावेश करण्यात आला. जेणेकरून हे जाणून घेता यावं की, जास्त वेळ बसल्याने तरूण आणि वयस्कांच्या कोलेस्ट्रॉलवर आणि बॉडी मास इंडेक्सवर काय प्रभाव पडतो.
यात सहभागी लोकांचा रोजचा ९ तास बसण्याचा रेकॉर्ड नोंदवण्यात आला, तर ८० ते १६० मिनिटे त्यांनी मध्यम शारीरिक अॅक्टिविटी केली. यातून समोर आलं की, जर कुणी जास्त वेळ बसून राहत असेल, ते तेवढे जास्त लवकर म्हातारे होतात.
रेनॉल्ड्स म्हणाले की, "कामानंतर थोडा वेळ चालणं पुरेसं नाही. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जे लोक रोज ३० मिनिटे धावतात किंवा सायकल चालवतात त्यांचं कोलेस्ट्रॉल आणि बीएमआय प्रमाण ५ ते १० वर्षाच्या छोट्या व्यक्तींसारखं दिसतं. अभ्यासक म्हणाले की, कामाच्या मधे छोटे छोटे ब्रेक घेणं यात फायदेशीर ठरू शकतं".