मीठ किती खायचं? खायचं की नाही? याविषयी तुम्हाला जे माहिती आहे तेच चुकीचं आहे, कारण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 05:17 PM2017-11-14T17:17:20+5:302017-11-14T17:18:59+5:30

मीठ कमी खा, वरुन घेऊ नका असा प्रचार गेले 40 वर्षे चालला आहे, आणि आता शास्त्रज्ञ म्हणतात की, तेच चूक होतं.

everything you know about salt is WRONG because.. | मीठ किती खायचं? खायचं की नाही? याविषयी तुम्हाला जे माहिती आहे तेच चुकीचं आहे, कारण.

मीठ किती खायचं? खायचं की नाही? याविषयी तुम्हाला जे माहिती आहे तेच चुकीचं आहे, कारण.

Next
ठळक मुद्देमीठ जास्त खाण्याचा आणि वाढत्या बीपीचा संबंध असतो का?

मीठ किती खायचं, पानात वरुन खायचं की नाही, खारवलेले पदार्थ खायचे की नाही यावरुन आपणच चर्चा करतो असं काही नाही. जगभर ही चर्चा चालते. कुणी म्हणतं अन्न शिजल्यावर मीठ घाला, कुणी म्हणतं शिजताना. कुणी म्हणतं वजन वाढतंय, बीपीचा त्रास तर मीठ बंदच करा. कुणी म्हणतं आपली पुर्वीची पानात मीठ वाढून घ्यायची रीतच बरोबर होती. आता शास्त्रज्ञ तेच सांगत आहेत. यात खरं-खोटं काय. आता अलिकडेच प्रसिदध झालेला अभ्यास म्हणतोय की, मीठ खाण्याचा आणि हार्टअटॅकचा काही संबंध नाही. बीपीचाही काही संबंध नाही. हे सगळे अपप्रचार गेल्या चाळीस वर्षात झाले. प्रमाणात मीठ खाणं शरीराला अपायकारक नाही.
अमेरिकेतल्या मसुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञानी केलेला एक अभ्यास ब्रिटिश मेडिकल जर्नल ऑफ ओपन हार्टमध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासात जगभरातल्या अनेक देशांतल्या लोकांच्या मीठ खाण्याच्या सवयींचा आणि त्यांच्या आजारांचा अभ्यास करण्यात आला आहे.
साधारण दिवसाला 2.4 ग्रॅम मीठ खाणं शरीराला पुरेसं असतं. तेवढं खाण्यानं काही अपाय नाही. कोरिअन माणसं दिवसाला साधारण 4 ग्रॅमहून जास्त मीठ खातो. पण री जगात कोरिअन माणसांचं हायपरटेन्शन आणि हार्टअ‍ॅटॅकचं प्रमाण कमीच आहे. त्याउलट कमी मीठ खाणारे अनेकजण अमेरिकन हार्टअटॅकचे बळी आहेत. त्यामुळे मीठ कमी खा, बंदच करा, बीपी वाढेल ही समजूतच चूक आहे असं सांगतो. 
उलट मीठ अजिबातच न खाणं, खूपच कमी खाणं यानं शरीराची इन्शुरन्स स्वीकारण्याची क्षमता कमी होते. डायबिटीसची शक्यता वाढते.
त्यामुळे मीठ पूर्ण बंद करणं, अतीच कमी खाणं हे टाळलेलं बरं. चवीपुरतं मीठ हा पारंपरिक नियम लक्षात ठेवलेला बरा.

Web Title: everything you know about salt is WRONG because..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.