कोल्ड ड्रिंक्स आणि चॉकलेटचं अधिक सेवन ठरू शकतं हाडं ठिसूळ होण्याचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 02:15 PM2018-10-27T14:15:30+5:302018-10-27T14:18:24+5:30

आपल्या शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअमची गरज असते. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होतात. फक्त हाडं ठिसूळ होत नाहीत तर हाडांसंदर्भातील अनेक आजारही होतात.

excess intake of cold dink and chocolates make our bones weaker | कोल्ड ड्रिंक्स आणि चॉकलेटचं अधिक सेवन ठरू शकतं हाडं ठिसूळ होण्याचं कारण!

कोल्ड ड्रिंक्स आणि चॉकलेटचं अधिक सेवन ठरू शकतं हाडं ठिसूळ होण्याचं कारण!

आपल्या शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअमची गरज असते. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होतात. फक्त हाडं ठिसूळ होत नाहीत तर हाडांसंदर्भातील अनेक आजारही होतात. बदलती जीवनशैली आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसचं काहीसं शरीरातील कॅल्शिअमबाबत होतं. आपल्या आहारामध्ये असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने शरीरातील कॅल्शिअमची मात्रा नष्ट होते. त्याचे असे आहे की, आपण दिवसभरामध्ये कितीही कॅल्शिअम असलेला आहार घेतला तरीही त्यातील फक्त 20 ते 30 टक्के कॅल्शिअम शरीराला मिळतं. अशातच तुम्ही कॅल्शिअम नष्ट करणाऱ्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केला तर हाडं कमकुवत होतात. 

चॉकलेट 

सतत चॉकलेट खाल्याने हाडं कमजोर होतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिस आणि हाडांना फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. चॉकलेटमध्ये असलेले फ्लेवोनॉल आणि कॅल्शिअम 'बोन मिनरल डेंसिटी'साठी अत्यंत फायदेशीर ठरतं. परंतु यामध्ये असलेले ऑक्सलेट शरीरातील हाडांसाठी घातक ठरतं. 

प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांमधील प्रोटीन

प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ म्हणजे दूध, मांस यांसारख्या पदार्थांचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. परंतु, या पदार्थांचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणं शरीरासाठी घातक ठरतं. एका संशोधनानुसार, जे लोकं दररोज या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करतात त्यांना सामान्य लोकांच्या तुलनेत हाडांसंबंधातील रोग उद्भवण्याचा धोका अधिक असतो. 

चहा, कॉफी पिण्याची सवय 

कॅफेन शरीरासाठी अत्यंत घातक ठरतं. कॅफेनचे जास्त सेवन केल्याने हाडांवर वाईट परिणाम होतो. जास्त कॅफेन शरीरामधील कॅल्शिअम नष्ट करते. कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्यामुळे शरीरातील हाडं कमजोर होऊ लागतात. 

ब्रेड, केक आणि इतर बेकरी प्रोडक्ट 

अनेक लोकांना बेकरी प्रोडक्टसारखे ब्रेड, केकसारखे पदार्थ खाणं अधिक आवडतं. परंतु यांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते आणि इतरही अनेक हानिकारक तत्व असतात. त्यामुळे या पदार्थांचे अधिक सेवन केल्याने हाडं ठिसूळ होतात. त्याचप्रमाणे अनेक व्यक्तींना ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका संभवतो. अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, बेकरी प्रॉडक्ट्सच्या प्रोसेसिंगदरम्यान पदार्थांमधील पोषक तत्व नष्ट होतात.

सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट ड्रिंक्स असो किंवा कोल्ड ड्रिंक. फक्त आहारामधील सर्व कॅल्शिअम नष्ट करत नाहीत तर शरीरामध्ये असलेले कॅल्शिअमदेखील नष्ट करतात. त्यामुळे जी लोकं जास्तीतजास्त कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा फ्लेवर्ड ज्यूसचं सेवन करतात. त्या लोकांना हाडांसंदर्भातील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

Web Title: excess intake of cold dink and chocolates make our bones weaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.