'या' पदार्थाचा चहात वापर केल्यास पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 10:02 AM2019-05-29T10:02:40+5:302019-05-29T10:09:10+5:30
अनेकांना असं वाटतं की, आयुर्वेदिक आणि हर्बल पदार्थांचं सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकता. तसेच असाही समज असतो की, आयुर्वेदिक गोष्टींचे कोणते साइड इफेक्टही नसतात.
(Image Credit : Green Valley Spices)
अनेकांना असं वाटतं की, आयुर्वेदिक आणि हर्बल पदार्थांचं सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकता. तसेच असाही समज असतो की, आयुर्वेदिक गोष्टींचे कोणते साइड इफेक्टही नसतात. पण हा समज चुकीचा आहे. हर्बल प्रॉडक्टचेही गंभीर साइड इफेक्ट असू शकतात. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका नव्या रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आला आहे की, हर्बल जडी-बूटीपासून तयार पदार्थांचेही साइड इफेक्ट असतात आणि जर तुम्ही त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
हाय बीपीच्या तक्रारीनंतर रूग्णालयात करावं लागलं दाखल
कॅनडामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला हाय ब्लड प्रेशरच्या तक्रारीनंतर इमरजन्सीमध्ये रूग्णालयात भरती केलं गेलं. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही काय खाल्लं किंवा प्यायलं होतं? तेव्हा रूग्णाने सांगितलं की, त्यांने ज्येष्ठमधाचा होममेड चहा सेवन केला होता, ज्यानंतर हाय ब्लड प्रेशरची स्थिती निर्माण झाली.
ज्येष्ठमधाच्या अधिक वापराने नुकसान
कॅनडाच्या मेकगिल युनिव्हर्सिटीचे जीन पेरी फॅलेट सांगतात की, हर्बल प्रॉडक्ट्सचं जर अधिक प्रमाणात सेवन केलं गेलं, तर याचे साइड इफेक्ट्स होतात. ज्या प्रॉडक्ट्समध्ये ज्येष्ठमधाचा वापर केला जातो, त्यांच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. तसेच याने डोकेदुखी आणि छातीत वेदना अशाही समस्या होऊ शकतात. फॅलेट सांगतात की, जर ज्येष्ठमधाचा वापर केलेल्या पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात केलं तर बीपी वाढण्यासोबतच शरीरात वॉटर रिटेंशन होतं आणि पोटॅशिअमचं प्रमाणही कमी होतं.
ज्येष्ठमधाच्या चहाचं केलं होतं सेवन
या रिसर्चमध्ये सहभागी अभ्यासकांनी सांगितले की, कॅनडाच्या रुग्णालयात ज्या व्यक्तीला दाखल करण्यात आलं होतं, त्यांचं वय ८४ होतं आणि ते ज्येष्ठमधाच्या होममेड चहाचं फार पूर्वीपासून सेवन करत आले. त्यांचा बीपी प्रमाणापेक्षा अधिक वाढला होता. ज्यामुळे त्यांना डोकेदुखी, छातीत वेदना, फार जास्त थकवा आणि पायांमध्ये फ्लूइड रिटेंशनची समस्या झाली होती. रुग्णाने डॉक्टरांना सांगितले की, गेल्या दोन आठवड्यापासून दररोज दिवसातून १ किंवा २ ग्लास होममेड ज्येष्ठमधाच्या चहाचं सेवन करत होते.