जास्त साखर खाणं जीवावर बेतू शकतं, फॅटी लिव्हर कॅन्सरसहीत 'या' आजारांचा धोका असल्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 12:01 PM2021-06-18T12:01:47+5:302021-06-18T12:02:06+5:30

हा रिसर्च IIT मंडीच्या वैज्ञानिकांच्या टीमने केला. रिसर्चमध्ये त्यांना साखरेचं अत्याधिक सेवन आणि फॅटी लिव्हरच्या विकासात संबंध दिसून आला.

Excess sugar and carbohydrate intake can damage your liver or it can cause of nonalcoholic fatty liver disease | जास्त साखर खाणं जीवावर बेतू शकतं, फॅटी लिव्हर कॅन्सरसहीत 'या' आजारांचा धोका असल्याचा खुलासा

जास्त साखर खाणं जीवावर बेतू शकतं, फॅटी लिव्हर कॅन्सरसहीत 'या' आजारांचा धोका असल्याचा खुलासा

googlenewsNext

जर तुमचं सतत गोड पदार्थ खाण्याचं मन होत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण जास्त गोड खाल्ल्याने आरोग्यासंबंधी मोठ्या समस्या होतात. नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून खुलासा झाला आहे की, जास्त साखरेचं सेवन करणं म्हणजे गंभीर आजारांना निमंत्रण देणं. हा रिसर्च IIT मंडीच्या वैज्ञानिकांच्या टीमने केला. रिसर्चमध्ये त्यांना साखरेचं अत्याधिक सेवन आणि फॅटी लिव्हरच्या विकासात संबंध दिसून आला. याला मेडिकल क्षेत्रात नॉन अल्कोहोलिक फॅंटी लिव्हर (NAFLD) म्हणून ओळखलं जातं.

काय आहे हा आजार?

NAFLD ही एक अशी स्थिती आहे ज्यात लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होते. हैराण करणारी बाब ही आहे की, या आजाराबाबत रूग्णाला काही माहितच पडत नाही. हा आजार गपचूप सुरू होतो आणि सुरूवातील दोन दशकापर्यंत रूग्णात कोणत्याही प्रकारचे लक्षण न दिसल्याने आजार वाढतो. शरीरात अधिक चरबी म्हणजे फॅटी लिव्हरच्या कोशिकांना त्रास होऊ शकतो. या स्थितीत लिव्हरवर निशाण पडतात, जे नंतर लिव्हर कॅंन्सरचं रूप घेतात. NAFLD अधिक गंभीर झाल्यावर उपचार आणखी कठीण होतात.

कोणत्या कारणांनी होतो हा आजार?

Non-Alcoholic Fatty Liver Disease कारण जास्त फॅट असलेल्या पदार्थांचं सेवन करणं हे आहे. ज्यातील एक म्हणजजे साखरही आहे. त्यामुळे गोड खाताना काळजी घेतली पाहिजे. सामान्य साखर आणि कार्बोहायड्रेटच्या इतर रूपात साखर दोन्हींच्या अधिक सेवनाने लिव्हर कॅन्सरचा धोका वाढू शकतो. जास्त गोड आणि अधिक कार्बोहायड्रेटचं जास्त प्रमाण शरीरात पोहोचल्याने लिव्हर त्याला चरबीमध्ये बदलतं. 

भारतातील स्थिती

आयआयटी मंडीचे वैज्ञानिक डॉ. विनीत डॅनिअल म्हणाले की, देशातील जवळपास ९ ते  ३२ टक्के लोकसंख्येला ही समस्या आहे. एकट्या केरळमध्ये ४९ टक्के लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे. शाळकरी मुले जे लठ्ठ आहे, त्यांच्यातील ६० टक्के मुलांना ही समस्या आहे. सामान्य साखर आणि कार्बोहायड्रेटच्या इतर रूपात साखर दोन्ही याचं कारण आहे.

IIT टीमने शोधला उपचार

गोड पदार्थ खाल्ल्याने लिव्हरमध्ये चरबी जमा होण्यात संबंध स्पष्ट झाल्यावर या आजारावर उपचार शोधणं सोपं होईल. एनएफ-केबी रोखण्याच्या औषधाने साखरेमुळे लिव्हरला होणारी ही समस्या दूर केली जाऊ शकते. 

साखरेच्या सेवनाने होऊ शकतात आजार

साखरेच्या अधिक सेवनाने होणाऱ्या (Non-Alcoholic Fatty Liver Disease आजाराची लक्षणे रूग्णांमध्ये फार उशीरा दिसतात. या रोगाच्या जाळ्यात अडकल्यावर व्यक्तीला सूज, कॅन्सर अल्झायमर रोग, एथरोस्क्लेरोसिस, आयबीएस, स्ट्रोक मांसपेशींचं नुकसान आआणि संक्रमणाचा धोका वाढतो.

Web Title: Excess sugar and carbohydrate intake can damage your liver or it can cause of nonalcoholic fatty liver disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.