खूप राग येतो किंवा भूक लागत नाही, डिप्रेशनची आहेत ही लक्षणे; तुम्हाला तर होत नाही असं काही?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:50 PM2022-11-16T15:50:53+5:302022-11-16T15:57:36+5:30

सध्या आजुबाजुला बघितले तर ४ पैकी ३ जणांना डिप्रेशन हे असतेच. पावलोपावली वाढलेली स्पर्धा, टेंन्शन, कमी झोप, सोशल मीडियाचा अतिवापर यांसारख्या कारणांमुळे नैराश्य येते.

excessive-anger-less-food-intake-can-be-symptoms-of-depression | खूप राग येतो किंवा भूक लागत नाही, डिप्रेशनची आहेत ही लक्षणे; तुम्हाला तर होत नाही असं काही?

खूप राग येतो किंवा भूक लागत नाही, डिप्रेशनची आहेत ही लक्षणे; तुम्हाला तर होत नाही असं काही?

googlenewsNext

स्वत:शीच बडबड करणारे अनेक जण आपण आजुबाजुला बघितले असतील. मात्र हे एक नैराश्याचे कारण असू शकते.  उदास असणे, भूक न लागणे हे देखील नैराश्याचे लक्षण असू शकते. सध्या आजुबाजुला बघितले तर ४ पैकी ३ जणांना डिप्रेशन हे असतेच. पावलोपावली वाढलेली स्पर्धा, टेंन्शन, कमी झोप, सोशल मीडियाचा अतिवापर यांसारख्या कारणांमुळे नैराश्य येते. एखाद्यावर खूप जबाबदारी असेल तर त्यातुनही त्याला नैराश्य येऊ शकते. नैराश्यात माणसाच्या वेगवेगळ्या भावना समोर येतात. कधी कोणाला खूपच राग येतो तर कधी कोणी लगेच दु:खी होतो. रोजच्या जीवनात अनेक बदल होऊ लागतात. यावरुन तुम्हाला नैराश्य आले हेच कळते. 

एकटे आणि उदास वाटणे 

जर तुम्हाला गर्दीत असून सुद्धा एकटे एकटे वाटत असेल, उदास वाटत असेल तर हे नैराश्याचे लक्षण आहे. नैराश्यात इतरांपासून दूर राहायचीच जास्त इच्छा होते. सतत डोक्यात विचार सुरु असतात. 

चिडचिड करणे 

नैराश्यात अनेकदा व्यक्ती कारण नसताना चिडतो, रागवतो. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो. अनेकदा तर क्षुल्लक कारणावरुनही व्यक्ती समोरच्यावर जोरजोरात ओरडतो. रागावर ताबा राहत नाही. 

कमी झोप

माणसाने पुरेशी झोप घेणे शरीरासाठी गरजेचे असते. ७ ते ८ तास रोज झोप झाली पाहिजे असा सल्ला डॉक्टरही देतात. मात्र कमी झोप नैराश्याला कारण ठरु शकते. झोपेची समस्या असलेल्यांना दिवसभर कंटाळवाणे, उदास वाटते. 

भूक न लागणे 

नैराश्यात असलेला व्यक्ती सतत काही ना काही विचारात असतो. आवडीचे पदार्थ समोर असून सुद्धा खायची इच्छा होत नाही. तर याउलट नैराश्यात जास्त खायचीही इच्छा होते याला इमोशनल इटिंग म्हणले जाते. 

स्वत:ला नुकसान पोहचवणे 

ही एक अशी गंभीर मानसिक स्थिती असते ज्यामध्ये व्यक्ती स्वत:लाच नुकसान पोहचवते. स्वत:चाच रागराग करायला लागते. जे अनेकदा गंभीरही असू शकते. या रुग्णांनी वेळीच डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे असते. 

नैराश्यावर एकच पर्याय आहे तो म्हणजे कमी विचार करा, गोष्टी मनाला लावून घेऊ नका. जास्त विचार केल्याने डोक्यात सतत तेच विचार येतात आणि परिणामी व्यक्ती नैराश्यात जातो. 
 

Web Title: excessive-anger-less-food-intake-can-be-symptoms-of-depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.