फिटनेसच्या नावाखाली शरीराला जास्त त्रास दिला, तर येऊ शकतं नपुंसकत्व, किडनीही होऊ शकते फेल..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 05:44 PM2017-12-26T17:44:19+5:302017-12-26T17:47:42+5:30
बघा, ही सात लक्षणं तुमच्यात दिसतात का ते?..
- मयूर पठाडे
व्यायाम अनेक जण करतात, पण कोणता व्यायाम सर्वसामान्य आहे आणि कोणता ‘अति’ हे कसं ओळखायचं. कारण त्यासाठी काही सर्वसाधारण नियम नाही. वय, लिंग, तुमची शारीरिक क्षमता, तुमची आवड आणि तुम्ही पूर्वीपासूनच कसलेले व्यायामपटू आहात कि नवशिके, नव्यानंच व्यायामाकडे वळलेले.. या साºया गोष्टींवर तुमची व्यायामाची लेवल ठरते आणि कोणता, किती व्यायाम तुम्हाला योग्य, हे देखील या साºया गोष्टींवरुनच कळतं.
पण व्यायामाबाबत तुम्ही कसलेले असा किंवा नवीन, काही लक्षणं मात्र सर्वांमध्ये थोड्याफार फरकानं सारखी असू शकतात आणि तुम्हाला ती कळतातही.
तुमच्या जवळच्या लोकांना तर ही लक्षणं लक्षात येतातच, पण तुम्हीही फिटनेस फ्रिक असाल, तर आपण ‘अति’ करत आहोत की नाही, हे तुमचं तुम्हालाही कळू शकतं.
खाली दिलेली सर्वसाधारण लक्षणं जर तुमच्यात दिसत असतील, तर नक्कीच काळजी करण्याचं कारण आहे आणि आपण त्याकडे तातडीनं, गांभिर्यानं लक्ष दिलं पाहिजे हे लक्षात घ्या.
काय आहेत ही लक्षणं?
१- तुमच्या क्षमतेपेक्षा जर तुम्ही अधिक व्यायाम करीत असाल, तर तुमची चयापचय क्रिया सुधारण्यापेक्षा ती बिघडेतच.
२- तुम्ही महिला असा, वा पुरुष, अति व्यायामामुळे तुमच्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर म्हणजे जननक्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो.
३- अति व्यायामाचा शरीर आणि मनावरही मोठा ताण पडतो. रिलॅक्स होण्यासाठी आणि झालेली झीज भरून येण्यासाठी पुरेसा वेळच न मिळाल्याने तुमच्या शरीरासाठी अंतिमत: ते हानीकारकच ठरतं.
४- अति व्यायाम करणाºयांना अनेकदा डीहायड्रेशनची समस्या जाणवते. शरीरातील पाणी कमी झाल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
५- गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने तुमच्या सांध्यांवरही ताण येतो आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो.
६- हृदयावर अति व्यायामाचा ताण येतो आणि हृदयाच्या समस्या सुरू होऊ शकतात.
७- आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जर त्रास तुम्ही शरीर-मनाला देत असाल, तर किडनी डॅमेजची समस्याही उद्भवू शकते.