अतिव्यायामाची सवय आहे धोकादायक,‘हे’ आहेत त्याचे दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:12 PM2024-02-13T12:12:02+5:302024-02-13T12:14:46+5:30

व्यायाम करणे शरीराच्या वाढीसाठी फायदेशीर असते.

Excessive exercise habit is dangerous for health know about its side effects | अतिव्यायामाची सवय आहे धोकादायक,‘हे’ आहेत त्याचे दुष्परिणाम

अतिव्यायामाची सवय आहे धोकादायक,‘हे’ आहेत त्याचे दुष्परिणाम

Health Tips : व्यायाम करणे शरीराच्या वाढीसाठी फायदेशीर असते. सध्या जिममध्ये जाऊन वर्कआऊट करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. व्यायाम केल्यामुळे शरीरीक स्वास्थ्य सुधारते.  सोबतच मानसिक शांती देखील लाभते. वर्कआऊट प्लॅन तयार करताना स्वतःच्या दैनंदिन कामांचा आढावा घ्यावा. हा आराखडा बनवताना फिटनेस ट्रेनरची मदत घेता येते. आठवड्यातील ‘चार ते पाच दिवस व्यायाम आणि दोन दिवस विश्रांती’ अशा स्वरूपातील वर्कआऊट प्लॅन शरीरासाठी फायदेशीर असतो.

नेहमी थकल्यासारखे वाटणे : जास्त व्यायाम केल्यामुळे आपल्याला नेहमी थकल्यासारखे देखील वाटू शकते. रात्री ७-८ तासांची चांगली झोप घेतली आणि चांगला नाश्ता केला तरीही थकल्यासारखे वाटेल. त्यामुळे आपल्या मर्यादा समजून घेऊन व्यायाम करणे गरजेचे आहे. अति व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा ताण पडतो. त्यामुळे थकवा जाणवतो.

इजा होण्याचा धोका वाढतो : तुम्हाला तीव्र व्यायामाची सवय नसल्यास गंभीर दुखापत होण्याचा धोका वाढतो. स्नायू दुखणे, सांधेदुखी, पाठीचे दुखणे या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे व्यायाम करताना संयम बाळगा.

निद्रानाशाची समस्या : संयम ठेवून व्यायाम केल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप येते. परंतु, व्यायामशाळेत जास्त व्यायाम करून आपल्याला रात्री झोप येणार नाही. अस्वस्थ वाटू शकेल आणि झोप येणार नाही.

स्नायूंमध्ये वेदना होणे : बऱ्याचदा व्यायाम केल्यानंतर स्नायू दुखू शकतात. पण वेदनांचे प्रमाण जास्त असणे चिंता वाढवणारे असू शकते. अधिक व्यायाम केल्यामुळे स्नायूंमध्ये सहन न होणाऱ्या वेदना होऊ शकतात. वर्कआऊट सेशननंतर पुढील ७२ तास शरीरातील स्नायूंमध्ये वेदना होत असल्यास तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्यायाम करत आहात. हेवी वेट ट्रेनिंग केल्यानंतर स्नायू दुखू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत : व्यायाम करताना शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते. व्यायामादरम्यान शरीरातल्या काही स्नायूंवर ताण येतो. जास्तीचा व्यायाम केल्यामुळे शरीरामधील ऊर्जा खर्च होत असते. याचा नकारात्मक परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. रोगप्रतिकारशक्ती कमजोर झाल्याने अनेक आजार होण्याची शक्यता बळावते. आजारी पडण्यासाठी अतिव्यायाम करण्याची सवय अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरते.

हृदयाच्या ठोक्यांमध्ये वाढ होणे : तुमच्या हृदयाचे ठोके जर जलदगतीने वाढत असतील, तर त्याचा अर्थ तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्यायाम करत आहात. अति व्यायामामुळे शरीराला विश्रांती घ्यायला सवड मिळाली नसल्यामुळे हृदयाचे ठोके वाढले आहेत असा अर्थ काढला जातो.

 आपण दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम केल्यास आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते.

 त्यामुळे वजन देखील टिकून राहते आणि दुखापत होण्याचा धोका कमी असतो. 

 एक निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. मात्र, तुम्ही अतिजास्त व्यायाम करत असाल तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

 त्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक लक्षणे उद्भवू शकतात. 

Web Title: Excessive exercise habit is dangerous for health know about its side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.