रिकाम्या पोटी व्यायाम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 09:54 AM2018-08-30T09:54:44+5:302018-08-30T09:54:57+5:30
जर तुम्ही नेहमी व्यायाम करत असाल तर तुम्हाला अनेकदा प्रश्न पडत असेल की, रिकाम्या पोटी व्यायाम करायला हवा की, काही खाऊन? खरंतर या प्रश्नाचं अनेकजण वेगवेगळं उत्तर देतात.
जर तुम्ही नेहमी व्यायाम करत असाल तर तुम्हाला अनेकदा प्रश्न पडत असेल की, रिकाम्या पोटी व्यायाम करायला हवा की, काही खाऊन? खरंतर या प्रश्नाचं अनेकजण वेगवेगळं उत्तर देतात. हेल्थ एक्सपर्टही याबाबत वेगवेगळा सल्ला देतात. पण नुकत्याच यूकेमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, जर रिकाम्या पोटी व्यायाम केला तर अपेक्षेपेक्षा जास्त फॅट बर्न होतात. चला जाणून घेऊ की काय खरंच रिकाम्या पोटी व्यायाम केल्याचे काही फायदे आहेत का?
रिकाम्या पोटी व्यायाम सर्वांसाठीच नाहीये
व्यायाम करण्यासाठी वयाचं कोणतही बंधन नसतं. पण १५ वयापेक्षा कमी मुलांसाठी आणि ५५ पेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी रिकाम्या पोटी व्यायाम करणे नुकसानकारक ठरु शकतं. याचं कारण हे आहे की, या वयात शरीर फार मजबूत नसतं जितकं ते २०-२५ वयात असतं. त्यामुळे या वयातील लोकांनी व्यायाम करण्याच्या एक तासापूर्वी हलका नाश्ता किंवा प्रोटीन शेकचं सेवन करावं. खूप जास्त खाऊनही व्यायाम करणेही धोकादायक आहे त्यामुळे कमी प्रमाणात पौष्टिक आहार घ्यावा.
वेगाने कमी होईल वजन
जर तुम्ही रिकाम्या पोटी व्यायाम करत असाल तर तुमचं वजन वेगाने कमी होईल. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीरातील फॅट अधिक प्रमाणात बर्न होतात. त्यामुळे तुम्ही लवकर वजन कमी करु शकता. याचं कारण हे आहे की, आपल्या आहारातून घेतलेली एकस्ट्रा कॅलरीज फॅटच्या रुपात आपल्या शरीरात जमा होते. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी व्यायाम करता तेव्हा शरीर पहिले फॅट बर्न करुन एनर्जी निर्माण करतं. ज्याने जाडेपणा वेगाने कमी होतो.
डायबिटीज कंट्रोल राहतो
डायबिटीज अलिकडे एक मोठी समस्या झाला आहे. जर तुम्ही रिकाम्या पोटी व्यायाम केला तर तुमचं डायबिटीज कंट्रोल राहण्याची शक्यता आहे. शरीरात इन्सुलिन कमी असणं हे डायबिटीजचं मुख्य कारण आहे. त्यामुळे रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने हे खास हार्मोन शरीरात जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतात. याने डायबिटीज कमी होतो.
व्यायामाची योग्य वेळ कोणती?
काहीही खाल्यानंतर लगेच व्यायाम करणे घातक ठरु शकतं. त्यामुळे व्यायाम करताना खालील गोष्टींची काळजी घ्या.
१) हलकं काही खाल्यानंतर साधारण १ तासाने व्यायाम करा.
२) जर तुम्ही पोटभर काही खाल्लं असेल तर ३-४ तासांनी व्यायाम करा.
३) जर तुम्ही थोडं जेवण केलं आहे तर २ ते ३ तासांनी व्यायाम करा.
४) जर तुम्हाल कॉफीची सवय असेल तर व्यायाम करण्याच्या अर्धातास आधी केवळ अर्धा कप कॉफी प्यावी.
५) व्यायाम करण्याआधी, व्यायाम करताना आणि व्यायाम केल्यानंतर पाणी पिणे सर्वात चांगले.
६) व्यायाम केल्यानंतर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असलेला नाश्ता करावा.
७) तुम्हाला हवं असेल तर व्यायाम केल्यानंतर केळी, शेक सेवन करु शकता.