ना ड्रॉप ना औषधं डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी खा 'या' गोष्टी, काही दिवासात निघेल चष्मा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 10:09 AM2024-11-25T10:09:05+5:302024-11-25T10:10:10+5:30

जर तुम्हाला डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवायची असेल तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेळ केला पाहिजे.

Expert says Daily eat these fruits to improve your eyesight | ना ड्रॉप ना औषधं डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी खा 'या' गोष्टी, काही दिवासात निघेल चष्मा!

ना ड्रॉप ना औषधं डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी खा 'या' गोष्टी, काही दिवासात निघेल चष्मा!

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच लोकांचे डोळे कमजोर किंवा दृष्टी कमजोर होताना दिसत आहे. कमी वयातच चष्मा लावण्याची वेळ येत आहे. याला वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. फोन, कम्प्युटर, टीव्ही यांचा वापर अधिक वाढला आहे. तसेच खाण्या-पिण्यातही पौष्टिक नसल्याने डोळ्यांनाही योग्य ते पोषण मिळत नाही. अशात डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर तुम्हाला डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवायची असेल तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेळ केला पाहिजे. काही फळांचा आहारात समावेश केला तर डोळ्यांना आवश्यक ते पोषण मिळेल आणि डोळे नेहमीसाठी चांगले राहती. तुम्हाला चष्मा लावण्याची वेळ येणार नाही किंवा लागलेला चष्मा लगेच दूर करता येईल. 

रताळे

एक्सपर्टनुसार, रताळे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी चांगलं असतं. व्हिटॅमिन ए शरीरात कमी झालं तर डोळ्यांसंबंधी समस्या होतात. रताळ्याच्या सेवनाने डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो आणि रेटिनाची दृष्टी वाढते. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीनही भरपूर असतं.

गाजर 

गाजर आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं. या दोन्ही तत्वांमुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. यानी डोळ्यांच्या सेल्स वाढतात. गाजराचा ज्यूस रोज सेवन केल्यास डोळे चांगले राहतात. तसेच तुम्ही गाजर जेवणासोबत सलाद म्हणूनही खाऊ शकता. 

आवळा

आयुर्वेदात आवळ्यात फार महत्वाची औषधी मानलं जातं. आवळे डोळ्यांसाठी अमृतासमान असतात. आवळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्याने डोळ्यांच्या मसल्स मजबूत होतात आणि डोळ्यांमधील ब्लड फ्लोही सुरळीत होतो. रोज रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. तसेच वाढत्या वयासोबत होणाऱ्या डोळ्यांच्या समस्याही कमी होतात.

पपई

पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. पपई आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. पपईचं नियमितपणे सेवन केल्याने डोळ्यांना नुकसानकारक किरणांपासून वाचवलं जातं. पपई तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता. पपई स्मूदी सेवन करू शकता. डोळ्यांची जळजळ आणि सूज पपईने दूर होते.

Web Title: Expert says Daily eat these fruits to improve your eyesight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.