टॉयलेट सीटवर 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणं घातक, या गंभीर समस्येचा वाढतो धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 11:56 AM2024-11-16T11:56:22+5:302024-11-16T11:57:18+5:30
ही सवय जरी तुम्हाला सामान्य वाटत असली तरी एक्सपर्टनी सांगितलं की, टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसून राहिल्याने आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
काही लोकांना टॉयलेट सीटवर तासंतास बसून पेपर वाचण्याची किंवा फोन बघत बसण्याची सवय असते. कारण काहीही असो पण तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. ही सवय जरी तुम्हाला सामान्य वाटत असली तरी एक्सपर्टनी सांगितलं की, टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसून राहिल्याने आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटरचे कोलोरेक्टल सर्जन डॉक्टर लाई जू यांच्यानुसार, टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसून राहिल्याने हेमोरॉयड्स आणि कमजोर पेल्विक मसल्सची समस्या होऊ शकते.
पोट साफ होण्याची समस्या
असिस्टंट प्रोफेसर ऑफ मेडिसिन आणि इन्फ्लेमेटरी बॉवेल डिजीज सेंटर स्टोनी ब्रुक मेडिसिन ऑन लॉन्ग आईलैंड न्यूयॉर्कच्या डायरेक्टर, डॉक्टर फराह मौनजुर यांच्यानुसार, टॉयलेटमध्ये ५ ते १० मिनिट वेळ घालवणं पुरेसं आहे. टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने पार्श्वभागात वेगवेगळ्या समस्या होतात. वाढलेल्या दबावामुळे ब्लड सर्कुलेशन प्रभावित होत. जू यांच्यानुसार, याने ब्लड प्रवेश तर करतं, पण परत जात नाही. ज्यामुळे गुदद्वार आणि त्याखालच्या आजूबाजूच्या नसा, रक्तवाहिन्या भरतात. याने पाईल्सच समस्या होते.
हेमोरॉयड्सचा धोका
टॉयलेट सीटवर तासंतास बसून जोर लावल्याने हेमोरॉयड्स म्हणजे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो. मौनजुर यांच्यानुसार, टॉयलेट सीटवर बसून मोबाइलचा वापर केल्याने लोकांना वेळेचं भान राहत नाही आणि अशात मलत्याग करण्यासाठी मांसपेशींवर दबाव टाकावा लागतो. डॉक्टर जू यांच्यानुसार, असं केल्याने एनोरेक्टल अवयव आणि पेल्विक फ्लोरसाठी घातक ठरू शकतं.
कोलोरेक्टल कॅन्सर
काही कारणांमुळे लोकांना टॉयलेटमध्ये जास्त बसावं लागतं. पण विष्ठा पास करण्यास सतत होणाऱ्या या समस्येमुळे गस्ट्रोइंटेसटाइनल समस्या जसे की, इरिटेबल बॉवल सिंड्रोम आणि क्रोन डिजीजचा संकेत असू शकतो. पोट साफ न होणे आणि टॉयलेटमध्ये जास्त बसावं लागणं हे कॅन्सरचा संकेतही असू शकतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या रिपोर्टनुसार, १९९० च्या दशकाच्या मध्यात ५५ पेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरच्या केसेस वाढल्या.
टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसू नका
टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालवणं टाळावं. सोबत मोबाइल, पुस्तक किंवा पेपर घेऊन जाणं टाळावं. डॉक्टर जू यांच्यानुसार, जर तुम्हाला पोट साफ होण्यात समस्या होत असेल तर टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसण्याऐवजी कमीत कमी १० मिनिटे वॉक करा. त्याशिवाय तुम्ही आहाराची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये फायबरचा भरपूर समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, ओट्स, फळांचा समावेश करा.