तामिळनाडूमध्ये रेबीजमुळे गेला चार वर्षाच्या मुलाचा जीव, एक्सपर्ट सांगतात कसा कराल बचाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:10 PM2024-08-19T12:10:12+5:302024-08-19T12:11:14+5:30
Rabies : या आजारापासून बचाव करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागरूकता पसरवणे फार गरजेचे झाले आहे. कारण अनेकांना याबाबत काहीच माहीत नाही.
Rabies : दोन महिन्यांआधी तामिळनाडूमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. इथे चार वर्षाच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याने रेबिज झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. २७ जून रोजी ही घटना घडली होती. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण तो वाचू शकला नाही.
ही घटना समोर आल्यानंतर रेबीज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी गेल्यावर्षी गाझियाबादमध्येही एका मुलाचा रेबीजमुळे जीव गेला होता. या आजारापासून बचाव करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागरूकता पसरवणे फार गरजेचे झाले आहे. कारण अनेकांना याबाबत काहीच माहीत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला याबाबत माहीत आणि बचावाचे उपाय सांगणार आहोत.
कसा परसतो रेबीज?
मनुष्य आणि इतर मेमल्स म्हणजे सस्तन प्राण्यांचे सेंट्रल नर्वस सिस्टम रेबीज नावाच्या वायरल डिजीजने प्रभावित होतात. सामान्यपणे कुत्री, वटवाघळं यांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या चाव्यामुळे रेबीज होतो. रेबीज लायसावायरसमुळे होतो. ज्यामुळे सूज येते आणि ही सूज मेंदुपर्यंत जाते.
ताप, डोकेदुखी आणि थकवा याची सुरूवातीची लक्षणं आहेत. पुढे जाऊन याने पॅरालिसिस, हेलुसिनेशन आणि हायड्रोफोबिया (पाण्याची भीती) यांसारखे गंभीर लक्षण दिसतात. हा आजार वाढण्यापासून रोखण्यासाठी रेबीज वॅक्सिनसहीत इतरीही औषधं दिली जातात.
कसा होतो हा आजार?
रेबीजसाठी जबाबदार वायरस सामान्यपणे संक्रमित प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. कुत्रा, वटवाघळं, कोल्हे यांच्या चाव्या मुळे हा आजार मनुष्यांना होतो. जखमेच्या माध्यमातून वायरस शरीरात प्रवेश करतो आणि मेंदुपर्यंत जातो.
वॅक्सीन कधी लावावी?
एक्सपर्ट सांगतात की, वायरल एक्सपोजरनंतर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर वॅक्सीन लावून घ्यावी. सामान्यपणे कोणत्याही प्राण्याने चावल्यानंतर २४ तासांच्या आत रेबीजची वॅक्सीन दिली जाते.
कसा कराल बचाव?
तुमच्या घरात असलेल्या पाळीव प्राण्यांचं वॅक्सीनेशन करून घ्या आणि प्राण्यांपासून शक्यतो दूर रहा.
प्राण्यांनी चावा घेतलेल्या जखमां स्वच्छ करण्यासाठी लगेच साबण आणि पाण्याचा वापर करावा.
जर तुम्ही घातक प्राण्यांच्या संपर्कात येत असेल तर लगेच मेडिकल हेल्प घ्या.
रेबीजवर उपाय
प्राण्याने चावल्यानंतर लगेच जखम स्वच्छ करा. तसेच डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार घ्या.
एकदा जर लक्षणं दिसली तर रेबीज जवळपास नेहमीच घातक होतो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता लगेच वॅक्सीनेशन करून घ्या.