पूर्ण दिवस घरी राहिल्यानं शरीराचं होतंय मोठं नुकसान; मानसोपचार तज्ज्ञांची धोक्याची सुचना
By manali.bagul | Published: January 19, 2021 06:52 PM2021-01-19T18:52:44+5:302021-01-19T19:08:17+5:30
Side Effects of spending whole day indoors : सगळ्यात आधी मी हे सांगेन की या वातावरणात लोकांना घरात थांबायला जास्त आवडतं कारण वातावरणातील गारवा वाढल्यामुळे खूप सुस्ती येत असते. यात असामान्य असे काहीही नाही.
कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे मागच्या काही वर्षांच्या तुलनेत लोकांना या वर्षी जास्त काळ घरी थांबता आलं. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने लोकांना नाईलाजाने लोकांना घरी बसवलं. कोरोनाची माहामारी संपली नाही तितक्यात कडाक्याच्या थंडीने लोक हैराण झाले आहेत. अशा स्थितीत लोक जास्तीत जास्तवेळ घरी राहत आहेत. दरम्यान वैद्यकिय मानसोपचार तज्ज्ञांनी संपूर्ण दिवस घरी राहिल्यानं शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत सांगितले आहे.
डॉ. जो डेनियल्स एक क्लीनिकल मानसोपचार तज्ज्ञ आहेत. कोरोना व्हायरसच्या माहामारीदरम्यान त्यांनी अशा रुग्णांवर उपचार केले ज्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. स्टायलिश मॅनजीनशी बोलताना डॉ. डेनियल्स यांनी सांगितले की, ''सगळ्यात आधी मी हे सांगेन की या वातावरणात लोकांना घरात थांबायला जास्त आवडतं कारण वातावरणातील गारवा वाढल्यामुळे खूप सुस्ती येत असते. यात असामान्य असे काहीही नाही.
दुसरं म्हणजे कोरोनामुळेही लोक आपापाल्या घरी आरामात राहणं पसंत करत आहेत. तुम्हालासुद्धा घराबाहेर जास्त पडू नये असं वाटत असेल पण तुमचा हाच विचार नुकसानकारकही ठरू शकतो. कारण यामुळे अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हळूहळू आजूबाजूला असलेल्या परिस्थितीमुळे ताण यायला सुरूवात होते. ''
डॉ. डेनियल्स यांनी पुढे सांगितले की, ''मी पुन्हा पुन्हा सांगेन की शरीराला चांगले ठेवण्यासाठी व्यायाम करणं महत्वाचं आहे. दररोज व्यायाम केल्यानं तुम्ही शारीरीक तसंच मानसिकदृष्या निरोगी राहू शकता. व्यायामानं ताण तणाव कमी होतो. शरीरातील हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतात, परिणामी मूड चांगला राहतो. त्यामुळे तुमचे शरीर इंन्फेक्शन्सशी लढण्यासाठी तयार होते.'' मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा
माणूस हा समाजशील आहे. कोरोनाकाळात बराचवेळ लोकांनी घरी बसून घालवला. जास्तवेळ एकांतात घालवल्याने माणूस स्वतःच्या विचारात असतो, त्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम करणं शक्य नसेल तर तुम्ही चालण्याचा सोपा व्यायाम करायलाच हवा. 'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब