फुलकोबीचे फायदे खूप माहीत असतील आता नुकसान जाणून घ्या, होऊ शकतात गंभीर समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:46 AM2023-12-01T11:46:04+5:302023-12-01T11:46:35+5:30
Health Tips : न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी सांगितलं की, नियमितपणे फुलकोबीचं सेवन केल्याने शरीराला काय काय नुकसान होऊ शकतात.
Health Tips : हिवाळ्यात बाजारात वेगवेगळ्या भाज्या मिळतात. या भाज्यांमध्ये सगळ्यात जास्त खाल्ली जाणारी भाजी म्हणजे फुलकोबी. हिवाळ्यात फुलकोबीची भाजी, पराठे आणि भजी खाण्याची एक वेगळीच मजा येते. ही भाजी टेस्टी असण्यासोबतच याचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात.
फुलकोबीमधील पोषक तत्वांबाबत सांगायचं तर व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, मॅग्नीजसारखे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यात भरपूर असतात. सोबतच यात फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इंफ्लामेटरी गुणही असतात.
इतकी टेस्टी आणि आरोग्याला फायदेशीर भाजी असूनही फुलकोबीचे अनेक नुकसानही आहेत. न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी सांगितलं की, नियमितपणे फुलकोबीचं सेवन केल्याने शरीराला काय काय नुकसान होऊ शकतात.
फुलकोबी खाण्याचे फायदे
फुलकोबीचे नुकसान जाणून घेण्याआधी त्याचे फायदे जाणून घेऊया. यात इंडोल-3 कार्बिनॉल आणि सल्फोराफेनसारखे तत्व असतात, जे शरीरात इन्फ्लेमेशन कमी करतात. फुलकोबीमध्ये फायबर, पोटॅशिअम आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि बीपीला कंट्रोल करतात. तसेच यातील फायबरमुळे पचनही चांगलं होतं.
फुलकोबी खाण्याचे नुकसान
पोट फुगण्याची समस्या
असं मानलं जातं की, कोबी फॅमिलीतील भाज्यांच्या अधिक सेवनाने पोट फुगण्यासारखी पचनासंबंधी समस्या होऊ शकते. फुलकोबीसोबतही ही समस्या आहे. याने पचनासंबंधी समस्या होऊ शकते. मुळात क्रूसिफेरस भाज्यांना पचवणं अवघड असतं. खासकरून तेव्हा जेव्हा त्या कच्च्या खाल्ल्या जातात. यामुळे सूज आणि गॅसची समस्या होऊ शकते.
पोटात येऊ शकते सूज
क्रूसिफेरस भाज्यांमध्ये रॅफिनोज असतं, जे एकप्रकारचं कार्बोहायड्रेट आहे. शरीरात याला तोडण्यासाठी आवश्यक एंजाइम नसतं. जेव्हा तुम्ही या कार्बोहायड्रेटच्या भाजीचं सेवन करता तेव्हा ती न पचताच छोट्या आतडीमधून मोठ्या आतडीमध्ये जाते. तिथे बॅक्टेरिया त्यावर हल्ला करतात आणि यामुळे पोटात सूज येऊ शकते.
गॅसची गंभीर समस्या
फुलकोबीमध्ये ग्लूकोसायनोलेट्स नावाचं सल्फरयुक्त रसायनही असतं. जेव्हा रसायन पोटात तुटतं, तेव्हा हायड्रोजन सल्फाइडसारखे तत्व तयार होतात, ज्यामुळे पोटात भयंकर गॅस तयार होतो. हेच कारण आहे की, ही भाजी खाल्ल्यानंतर पोट जड वाटू लागतं.
हायपोथायरायडिज्म
फुलकोबीसारख्या भाज्या ग्रंथींचं कामकाज बाधित करू शकतात. हायपोथायरायडिज्म किंवा अशा स्थितीने पीडित लोकांनी या भाजीचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
अॅलर्जीचा धोका
काही लोकांना फुलकोबीच्या सेवनाने अॅलर्जिक रिअॅक्शन होऊ शकतं. अशा अॅलर्जीमुळे त्वचेवर खाज, श्वास घेण्यास समस्या आणि सूज येऊ शकते. जर तुम्हाला आधीच एखादी अॅलर्जी असेल तर ही भाजी खाऊ नका.