"मुलं उशीरा उठतात म्हणून रागावणं बंद करा", एक्सपर्टनी सांगितली ही आहे मोठी चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:56 AM2024-06-28T09:56:42+5:302024-06-28T09:57:15+5:30
Sleeping cycle of child : न्यूट्रिशनिस्ट प्रशांत देसाई यांनी इन्स्टावरील एका व्हिडीओ सांगितलं की, लहान मुलांना उशीरापर्यंत झोपू द्या.
Sleeping cycle of child : लहान मुलांच्या वेगवेगळ्या सवयी असतात. ज्यात उशीरा झोपणे आणि उशीरा उठणे याबाबत जवळपास सगळ्याच पालकांना तक्रार असते. पालक मुलांना झोपण्यावरून आणि सकाळी लवकर उठण्यावरून नेहमीच रागावत असतात. पण याबाबत एक्सपर्टचं वेगळं मत आहे. एक्सपर्टनुसार, लहान मुले उशीरा झोपली तर त्यांची कार्यक्षमता वाढते. अशात न्यूट्रिशनिस्ट प्रशांत देसाई यांनी इन्स्टावरील एका व्हिडीओ सांगितलं की, लहान मुलांना उशीरापर्यंत झोपू द्या. कारण त्यांची सर्केडियन रिदम या वयात वेगळी असते. यामागचं सायन्सही वेगळं आहे.
प्रशांत देसाई यांनी सांगितलं की, सर्केडियन रिदम आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळत असते. ते रात्री आपली रक्षा करत होते. वयस्क लोक लवकर झोपत होते. तारूण येण्याआधी शरीर ८ ते ९ तासांची झोप मागू लागतं. तर तारूण्यानंतर सर्केडियन रिदम १० ते ११ तासांवर शिफ्ट होतंय.
रिसर्चमधून समोर आलं आहे की, जास्तीत जास्त टीनएजर्सना रोज हवी तेवढी झोप मिळत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या झोपेची गरज वेगवेगळी असते. टीनएजर्सना या काळात एका महत्वाच्या टप्प्यावर असतात. त्यामुळे त्यांना वयस्कांच्या तुलनेत जास्त झोपेची गरज असते. सरासरी टीनएजर्सना रात्री ९ तासांची झोप गरजेची असते. जेणेकरून ते सतर्क राहतील आणि त्यांना आराम मिळेल. त्यामुळे लहान मुलांना चांगली झोप घेऊ द्या. त्यांना लवकर उठण्यासाठी जबरदस्ती करू नका.
काय आहे सर्केडियन रिदम?
सर्केडियन शब्ज लॅटिन शब्द ‘सर्का दीम’ (circa diem) मधून आला आहे. ज्याचा अर्थ आहे ‘जवळपास एका दिवसात’. सर्केडियन रिदम किंवा बॉडी क्लॉक बाहेरील वातावरणात एखाद्या जीवाच्या झोपण्याचं आणि जागण्याचं चक्र, चयापचय मार्ग नियंत्रित करण्याची एक आंतरिक प्रक्रिया आहे.