अनेकांना माहीत नसते फळं खाण्याची योग्य पद्धत, एक्सपर्टनी दिला याबाबत खास सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:35 AM2024-04-19T10:35:42+5:302024-04-19T10:36:32+5:30
Fruits Eating Tips : बऱ्याचदा लोकांना फळ कसं खावं हे माहीत नसतं. त्यामुळे त्या फळातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत. आयुर्वेदानुसार, कोणतंही फळ खाण्याची एक पद्धत असते.
Fruits Eating Tips : फळं ही आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉक्टर नेहमीच वेगवेगळी सीझनल फळं खाण्याचा सल्ला देत असतात. कारण या फळांमधून आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात. बरेच लोक नियमितपणे फळं खातात. पण बऱ्याचदा लोकांना फळ कसं खावं हे माहीत नसतं. त्यामुळे त्या फळातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत. आयुर्वेदानुसार, कोणतंही फळ खाण्याची एक पद्धत असते.
फळ जर तुम्ही योग्य पद्धतीने खाल्लं नाही तर आरोग्यासाठी ते नुकसानकारक ठरू शकतं. असं आम्ही नाही तर लॉन्जेविटी एक्सपर्ट प्रशांत देसाई यांनी एका इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. ते म्हणाले की, फळं खाण्याची एक पद्धत आणि योग्य प्रमाण असतं. याकडे दुर्लक्ष करं किंवा ते फॉलो न करणं नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ त्यांनी काय सांगितलं.
कसं खावं फळ?
एक्सपर्टनुसार, कधी कोणतंही फळ हे पूर्ण खावं. जर त्याची साल खाण्यायोग्य असेल तर ती सुद्धा खावी. कारण कधी कधी यात जास्त फायबर आणि इतर पोषक तत्व असतात. एक फळ जर पूर्ण खात नसाल तर 50 वयापर्यंत निरोगी आणि फिट राहणं अवघड होऊ शकतं.
फ्रूट ज्यूस की फळ?
बरेच लोक असा विचार करतात की, फळांचा ज्यूस प्यायल्याने त्यांना जास्त फायदा होतो. काही लोक तर फळं खाण्याचा कंटाळा येतात म्हणून ज्यूस पितात. पण असं केल्याने जास्त फायदा नाही तर नुकसान होतं. कारण फळांची सगळी शक्ती ही फळांच्या बारीक झालेल्या भागात राहते. ज्यूसमध्ये केवळ लिक्विड शुगर आणि फ्रुक्टोज असतं. जास्त काळ तुम्ही केवळ ज्यूस पित असाल तर डायबिटीसच्या रूग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
कसं खाऊ नये फळ?
बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यामध्ये केवळ फळं खातात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण यामुळे शरीरात फार जास्त ग्लूकोज स्पाइक ग्लायकेशन होऊ शकतं. त्यामुळे फळं कधीही काही नट्स, चीज किंवा योगर्ट सोबत खावीत. याने शुगर स्पाइक कमी होईल.
जास्त कोणती फळं खावीत?
वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी फळं आवडतात. पण जास्त फायद्यासाठी जास्तीत जास्त आंबट फळं खाण्याचा प्रयत्न करावा. यात व्हिटॅमिन सी, वॉटर कंटेंट आणि फायबर भरपूर असतं. पण केळी आणि द्राक्षासारखे जास्त शुगर असलेली फळं कमी खावीत. सोबतच लहान मुलांना एक पूर्ण फळ खायला लावा. याने त्यांचा अनेक आजारांपासून बचाव होईल.