रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? वाचा तज्ज्ञांनी दिलेल्या BP नियंत्रणात ठेवण्याच्या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 05:22 PM2020-10-09T17:22:26+5:302020-10-09T17:25:17+5:30

Health tips in Marathi : रक्तदाब कमी झाल्यास किंवा वाढल्यास अवयवांना नुकसान पोहोचतं .म्हणून प्रत्येकानं रक्तदाब योग्य प्रमाणात असायला हवं, याची काळजी घ्यायला हवी.

Experts says what is the relationship between blood pressure and heart health | रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? वाचा तज्ज्ञांनी दिलेल्या BP नियंत्रणात ठेवण्याच्या टीप्स

रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? वाचा तज्ज्ञांनी दिलेल्या BP नियंत्रणात ठेवण्याच्या टीप्स

googlenewsNext

सामान्य रक्तदाब असल्यास शरीरातील वेगवेगळ्या भागात रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह योग्य प्रमाणात झाल्यास शारीरिक समस्या कमी प्रमाणात उद्भवतात. रक्तदाब कमी झाल्यास किंवा वाढल्यास  अवयवांना नुकसान पोहोचतं, म्हणून प्रत्येकानं रक्तदाब योग्य प्रमाणात असायला हवं, याची काळजी घ्यायला हवी. याबाबत ओन्ली माय हेल्थशी बोलताना एशियन हार्ट इंस्टीट्यूट मुंबई येथिल वरिष्ठ हदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष कुमार डोरा  (Dr Santosh Kumar Dora, Senior Cardiologist, Asian Heart Institute, Mumbai)। यांनी माहिती दिली आहे. 

९५ टक्के लोकांमध्ये रक्तदाबासंबंधी समस्या उद्भवल्यास  कोणतीही लक्षणं दिसून येत नाही. उच्च रक्तदाब असलेल्या ५  ट्क्के लोकांना डोकेदुखी, थकवा, डोळ्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या उद्भवते. म्हणून रुटीन चेकअप नेहमी करायला हवं.  जर तुम्हाला  रक्तदाबासंबंधी कोणतीही समस्या नसेल तरी वर्षातून एकदा तपासणी करून घ्यावी.

१२०  म्हणजे पहिल्या आकड्याला  सिस्टोलिक असं म्हणतात. दुसरा आकडा  ८५ ज्याला डायस्टोलिक म्हणतात. या दोन्ही आकड्याचे काम वेगवेगळे असते. हृदयातील मासपेशी आकुंचन पावल्यानंतर धमन्यामधील ब्लड पंप होते. एका निरोगी व्यक्तीचे सिस्टोलिक ब्लड प्रेशर ९० ते १२० मिलिमीटरचे असते. डायस्टोलिकचे ब्लड प्रेशर  ६० ते ८० मिमीपर्यंत असायला हवे. १४०/९० पेक्षा जास्त रक्तदाब असल्यास हायपरटेंसिव्ह किंवा हाय ब्लडप्रेशरची समस्या उद्भवते.  ब्लड प्रेशर वाढल्यानंतर हृदयाच्या मासपेशी, डोळे, किडन्यांना नुकसान पोहोचतं अनेकदा रक्तस्त्रावही होतो. 

उच्च रक्तदाबाची कारणं

साधारणपणे लोकांना वाढत्या वयात उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार रक्त वहिन्यांशीनिगडीत समस्या उद्भवल्यानं  किडनी स्टोन, ब्रेन ट्यूमर, हार्मोनल इंबॅलेन्सची समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त अनेकांना जन्मजात हा त्रास असू शकतो. 

मीठात  ४० टक्के सोडियम आणि ६० टक्के क्लोराईड असतं. जेव्हा तुम्ही जेवणात जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करता तेव्हा शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. जास्त मिठात शिजवलेल्या अन्नाचे सेवन केल्यानंतर तीन तासांनी तुमचा रक्तदाब वाढायला सुरूवात होते. म्हणून आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात १५०० mg पेक्षा अधिक सोडीयमच सेवन  करून नये. अनियमित  जीवनशैली,  शरीराला पोषण देत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश नसणं, जेवणाची वेळ नक्की नसणं यामुळेही रक्तदाबासंबंधी  समस्या उद्भवू शकतात.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

व्यायाम किंवा योगा रोज केल्यानं रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. उद्भवल्यास कमी तीव्रतेनं उद्भवते. यासाठी २० ते ३० मिनिट वेळ काढून रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. याशिवाय सकाळी गरम पाणी प्यायल्याने ब्लड फ्लो आणि सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत होते. 

तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. कमी रक्तदाबावर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा-पंधरा पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. काळजी वाढली! थंडी अन् प्रदूषणामुळे कोरोनाचा प्रसार वाढणार, एम्सच्या डॉक्टरांची धोक्याची सुचना

पॅक फूड खाल्यानं रक्तदाबाच्या समस्या उद्भवण्याचा धोका दुप्पटीनं वाढतो. कारण त्यात जास्त प्रमाणत मीठाचा समावेश असतो.  याव्यतिरिक्त जास्त तेलयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू नका.  मीठाचे सेवन कमी प्रमाणात केल्यास  रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होतात? इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडून मागितला पुरावा

Web Title: Experts says what is the relationship between blood pressure and heart health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.