थंड पाणी प्यायल्याने सर्दी-खोकला होतो, हे खरं की खोटं? एक्सपर्ट्सने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:32 PM2024-01-05T12:32:52+5:302024-01-05T12:52:27+5:30
खरंच थंड पाणी पिणं नुकसानकारक असतं का? थेट पाईपमधून गरम पाणी पिऊ शकता का? कच्च पाणी काय आहे? या गोष्टींबाबत चर्चा केली जाते. चला तर मग जाणून घेऊ याबाबत काही तथ्य...
पाणी आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची योग्य लेव्हल कायम ठेवणं गरजेचं असतं. पाणी हे जीवन असल्याचं म्हटलं जातं. पण तरीही इतक्या नॉर्मल गोष्टीसाठीही वेगवेगळ्या गोष्टी आणि सल्ले सुरू असतात. खरंच थंड पाणी पिणं नुकसानकारक असतं का? थेट पाईपमधून गरम पाणी पिऊ शकता का? कच्च पाणी काय आहे? या गोष्टींबाबत चर्चा केली जाते. चला तर मग जाणून घेऊ याबाबत काही तथ्य...
थंड पाणी नुकसानकारक असतं
एका रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर काही व्हिडिओंमध्ये सांगण्यात आलं की, थंड पाणी प्यायल्याने रक्तनलिका आकुंचन पावतात आणि यामुळे डायजेशनमध्येही समस्या होते. पण मुळात याचे फार कमी पुरावे आहेत. 2001 मधील एका रिसर्चमध्ये 669 महिलांपैकी 51 महिलांचं थंड पाणी प्यायल्याने डोकं दुखलं होतं. पण त्यातील जास्तीत जास्त महिला मायग्रेनने पीडित होत्या.
2012 मध्ये असं आढळून आलं की, कोल्ड ड्रिंक से अचलासिया (एक दुर्मीळ आजर) च्या रूग्णांना समस्या होते. पण रिसर्चमध्ये केवळ 12 लोक सहभागी होते. जास्तीत जासत लोकांसाठी पाण्याचं तापमान पसंत आणि स्थितींवर अवलंबून असतं. उन्हाळ्यात एक्सरसाइजनंतर थंड पाणी आणि हिवाळ्यात आराम मिळण्यासाठी गरम पाणी प्यायल्याने तुमच्या एकूणच आरोग्यावर काही खास फरक पडणार नाही.
नळातील गरम पाणी पिऊ नये
यामागे एक वैज्ञानिक सत्यही लपलं आहे. गरम पाणी सामान्यपणे थंड पाण्याच्या तुलनेत हेवी असतं. त्यामुळे पाइपचं मेटल आणि मिनरल यात मिक्स होतात. गरम पाणी टॅंकमध्ये स्टोर केलं जातं आणि ते अनेकदा गरम व थंड केलं जातं.
बॅक्टेरिया आणि इतर आजार निर्माण करणारे माइक्रोब्स गरम पाण्यात जास्त तयार होता आणि काही दिवसांनी जास्त जमा होता. त्यामुळे नळातील गरम पाणी पिण्याऐवजी थंड पाणी एखाद्या भांड्यात गरम करून प्यावं.
बॉटलचं पाणी जास्त हेल्दी
नदी, तलावांसारख्या सोर्समध्ये पॉल्यूशनमुळे जगभरात बॉटलमधील पाणी काही ठिकाणी सेफ होऊ शकतं. पण ऑस्ट्रेलिया आणि अशा अनेक देशांमध्ये बॉटलमधील पिण्याचा काही खास फायदा नाही. क्वींसलॅंड विश्वविद्यालयाच्या अभ्यासकांनुसार, बॉटलमधील पाणी आणि नळातील पाण्यात फार फरक नाही. ते नळातील पाणीही असू शकतं आणि आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक फरकही सांगू शकणार नाही.
बॉटलमध्ये मिळणाऱ्या पाण्याची किंमती नळातील पाण्यापेक्षा जास्त असते. नळातील पाण्यात लीडही असू शकतो. अनेक देशांमध्ये यापासून बचाव करण्याचा उपाय शोधला गेला आहे. पण सगळीकडे असं शक्य झालं नाही. हेही नुकसानकारक ठरू शकतं.
कच्च पाणी नॅच्युरल आणि हेल्दी
काही लोक असं मानतात की, आपले पूर्वज कच्च पाणी पित होते आणि तरीही हेल्दी राहत होते. कच्च पाणी म्हणजे थेट नदी, तलाव, झरे, धबधब्याचं पाणी. पण हेही ध्यानात घ्यावं लागेल की, फार आधी पेचिश आणि हैजासारखे आजारही जास्त होत होते. कच्च पाणी पिणं काही भागांसाठी योग्य असू शकतं. पण आजकाल प्रदूषणाचा धोका जास्त वाढला आहे. त्यामुळे योग्य होईल की, हे पाणी चांगलं उकडून प्यावं.