Lipstick Side Effects: वापरत असाल जुनी लिपस्टिक तर होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 05:01 PM2022-02-27T17:01:01+5:302022-02-27T17:03:34+5:30

जुनी लिपस्टिक वापरल्यास तुमच्या ओठांवर परिणाम होऊ शकतो. कारण औषधांप्रमाणे मेकअपच्या प्रोडक्ट्सनाही एक्सपायरी डेट (Expiry Date) असते.

expired lipstick side effects for health and lips | Lipstick Side Effects: वापरत असाल जुनी लिपस्टिक तर होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

Lipstick Side Effects: वापरत असाल जुनी लिपस्टिक तर होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

googlenewsNext

मेकअपचा विचार येताच डोळ्यांसमोर येणारी पहिली गोष्ट म्हणजे लिपस्टिक (Lipstick). प्रत्येकाच्या मेकअप किटमध्ये (Makeup Products) लिपस्टिकही असतेच; पण बऱ्याचदा लग्न किंवा एखाद्या सणावाराच्या आधी मेकअपचं सामान हौशीने खरेदी केलं जातं. नंतर मात्र ते तितकंसं वापरलं जात नाही. मग जुनं मेकअपचं सामान आणि विशेषत: लिपस्टिक वापरावी की नाही, ही शंका मनात येतेच.

मेकअप किटमधलं (Makeup Kit) सामान जुनं झालेलं असेल तर ते वापरणं तुमच्या त्वचेसाठी नुकसानदायक ठरू शकतं. खासकरून जुनी लिपस्टिक वापरल्यास तुमच्या ओठांवर परिणाम होऊ शकतो. कारण औषधांप्रमाणे मेकअपच्या प्रोडक्ट्सनाही एक्सपायरी डेट (Expiry Date) असते. एक्सपायरी डेटनंतर ते मेकअप प्रॉडक्ट्स म्हणजे लिपस्टिक वापरल्यास तुमच्या त्वचेला नक्कीच अपाय होऊ शकतो. ही एक्सपायरी डेट लिपस्टिकवर दिसत नाही. याचा अर्थ असा नाही, की ती लिपस्टिक खराब होणार नाही. त्वचेचं नुकसान टाळायचं असल्यास तुमच्या मेकअप किटमधली लिपस्टिक चांगली आहे की नाही हे कसं ओळखावं, ते जाणून घ्या.

लिपस्टिक चांगली की वाईट हे ओळखण्याचे सोपे उपाय
साधारणतः सर्व लिपस्टिकचं शेल्फ लाइफ (Lipstick Shelf Life) २ वर्षं असतं. तुम्ही खरेदी केलेल्या लिपस्टिकला २ वर्षं एवढा काळ झाला असेल तर ती चुकूनही वापरू नका. कारण या एक्सपायर्ड लिपस्टिकमुळे तुमच्या ओठांना जळजळ आणि सूज येणं यासारखा त्रास होऊ शकतो.

कोणत्याही ब्रँडची लिपस्टिक (Branded Lipstick) असली तरी त्याला छानसा सुगंध असतो. जेव्हा लिपस्टिकची एक्सपायरी डेट उलटते तेव्हा त्याचा वास बदलतो. याचाच अर्थ ती लिपस्टिक वापरण्याजोगी राहत नाही. त्यामुळे अशी एक्सपायरी उलटलेली लिपस्टिक वापरू नका. कारण ती वापरल्यास ओठांना जळजळ तर होईलच, सोबत ती पोटात गेल्यासही अपाय होऊ शकतो. त्यामुळे ती लगेच फेकून द्या.

नवीन आणलेली लिपस्टिक ही पाहताक्षणी चमकदार दिसते. एक्सपायर्ड लिपस्टिकवर तुम्हाला मॉइश्चरचे थेंब दिसतील. तसं असेल, तर समजून जा, की ती लिपस्टिक वापरण्यायोग्य नाही.

Web Title: expired lipstick side effects for health and lips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.