दिवसभर थकवा जाणवतो का? 'या' गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 05:33 PM2018-12-12T17:33:59+5:302018-12-12T17:35:11+5:30

तुम्हाला अनेक दिवसांपासून थकवा जाणवतोय का? आजारी नसतानाही किंवा कोणत्याही कारणाशिवाय जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. कारण ही लक्षणं क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमची असू शकतात.

Extreme fatigue or tiredness may be the sign of chronic fatigue syndrome | दिवसभर थकवा जाणवतो का? 'या' गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

दिवसभर थकवा जाणवतो का? 'या' गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

Next

तुम्हाला अनेक दिवसांपासून थकवा जाणवतोय का? आजारी नसतानाही किंवा कोणत्याही कारणाशिवाय जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. कारण ही लक्षणं क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमची असू शकतात. या सिंड्रोममुळे व्यक्तीला अनेक दिवस थकवा जाणवतो. कितीही आराम केला तरिही हा थकवा दूर होत नाही. कितीही तपासण्या केल्या तरी त्या नॉर्मल येतात. साधारणतः एखाद्या व्यक्तीला 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस थकवा जाणवत असेल तर त्या व्यक्तीला क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमची झाल्याचं सांगितलं जातं. जाणून घेऊया क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमची लक्षणं आणि कारणं... 

ही आहेत क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमची लक्षणं :

  • थोडी शारीरिक मेहनत घेतल्यानंतरही 24 तासांपेक्षा अधिक काळ आजारी असल्यासारखं वाटणं
  • थकवा आल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होणं
  • स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवणं
  • सतत सांधेदुखीचा त्रास होणं
  • झोप न येणं आणि झोपल्यानंतरही आळस येणं
  • स्मरणशक्तीची समस्या होणं
  • सतत घसा खराब होणं

 

काय आहेत क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमची कारणं?

काही लोकांमध्ये क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमची कारणं दिसून येतात, तर काही लोकांमध्ये न समजणाऱ्या कारणांमुळेच हा आजार होतो. शरीरामध्ये होणारे अनेक प्रकारचे आजार आणि बदल असा थकवा येणाचं कारण असू शकतात. साधारणतः क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमला बळी पडलेल्या लोकांमध्ये ही लक्षणं आढळून येतात. 

व्हायरल इन्फेक्शन

अनेकदा लोकांना कोणत्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर बऱ्याच दिवसांपर्यंत हा थकवा कायम राहतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शनचं कारण काही हानिकारक बॅक्टेरिया आणि वायरसही असतात. हे वायरस क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमचं कारण बनू शकतात. 

इम्यून सिस्टम कमजोर झाल्यानंतर 

क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमचं शिकार अशा व्यक्ती जास्त होतात, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते. रोग प्रतिकारक शक्ती वायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्यासाठी शरीराची मदत करते. परंतु ही शक्तीच कमजोर असेल तर व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामध्ये क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमही असू शकतो. 

हार्मोन्सच्या असंतुलनामुळे 

क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमची शिकार असणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्मोन्सचं असंतुलनही आढळून येतं. अशा लोकांमध्ये हायपोथेलेम्स, पिट्यूटी ग्लँड किंवा एड्रेनल ग्लँड हार्मोन्स व्यवस्थित तयार करू सकत नाही. त्यामुळे या समस्या निर्माण होतात. 

Web Title: Extreme fatigue or tiredness may be the sign of chronic fatigue syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.