वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 10:14 AM2019-09-02T10:14:52+5:302019-09-02T10:15:30+5:30

वजन कमी करण्यासाठी ही डाएट फॉलो केली जाते. पण यामुळे शरीरात होणारे बदल आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात.

An extreme low carb diet may speed ageing and early death | वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक!

वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक!

Next

लो-कार्ब डाएटचं चलन अलिकडच्या वर्षांमध्ये फार वेगाने वाढलं आहे. वजन कमी करण्यासाठी ही डाएट फॉलो केली जाते. पण यामुळे शरीरात होणारे बदल आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. जपानमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, अधिक लो-कार्ब डाएट घेतल्याने वय लवकर वाढतं आणि लवकर मृत्युचा धोकाही वाढतो. अलिकडच्या वर्षांमध्ये लो-कार्ब डाएटची क्रेझ फार वेगाने वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी महिला लो-कार्ब डाएट अधिक फॉलो करतात. तुम्हीही लो-कार्ब डाएट घेत असाल तर तुम्हाला पुढील गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.

काय सांगतो रिसर्च?

जपानी विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकांचं मत आहे की, 'आतड्यांची चरबी घटवण्यासाठी आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी लो-कार्ब डाएट फायदेशीर असते. पण ही डाएट एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली करणे गरजेचं आहे'.

लो-कार्ब डाएटचे नुकसान?

वजन कमी करण्यासाठी लो-कार्ब डाएटचं सेवन करण्यासाठी फायदेशीर असते. पण जास्त काळासाठी सतत कार्बोहायड्रेटच्या कमी सेवनामुळे शरीरावर वाईट प्रभाव पडतो. चला जाणून घेऊ लो-कार्बने होणारे नुकसान..

लिव्हरसंबंधी समस्या

लिव्हर हा शरीरातील महत्वपूर्ण अवयव आहे. जास्त काळासाठी लो-कार्ब डाएट घेतल्याने लिव्हरसंबंधी समस्या होण्याचा धोका वाढतो. कार्बोहायर्डेटच्या कमतरतेमुळे लिव्हर फॅट आणि प्रोटीनपासून ग्लूकोज बनवू लागतो. ज्यामुळे शरीरात अमोनियाचं प्रमाण वाढतं. 

व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांची कमतरता

शरीरासाठी सर्वच पोषक तत्वांचा समावेश असलेला आहार घेणे गरजेचं असतं. पण जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त कमी कार्बोहायड्रेटचं सेवन केलं जातं तेव्हा शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळत नाहीत. या कारणामुळे शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता होते. त्यामुळे कॅल्शिअम, मॅग्नेशिअमची कमतरताही होते.

मांसपेशी होतात कमजोर

कार्बोहायड्रेटच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रोलाइटचं प्रमाणही कमी होतं. ज्यामुळे मासंपेशी कमजोर होऊ लागतात. आणि मांसपेशी कमजोर झाल्यावर अंगदुखी, जॉईंटमध्ये समस्या होऊ लागते.

मेंदूवरही पडतो वाइट प्रभाव

मेंदूच्या व्यवस्थित कार्यासाठी ग्लूकोजची गरज असते. शरीरातील ५० टक्के ग्लूकोज मेंदूद्वारे वापरलं जातं. शरीरात ग्लूकोज कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून वाढतं. आणि कमी कार्बोहायड्रेटमुळे मेंदूला आवश्यक तेवढं ग्लूकोज मिळू शकत नाही. सामान्यपणे सांगायचं तर एका हेल्दी व्यक्तीला १३० ग्रॅम कार्बोहायड्रेटची रोज गरज पडते.

हेल्दी कार्बोहायड्रेटसाठी काय खावं?

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि लो-कार्ब डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही डाएटमध्ये हेल्दी कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांचा समावेश करायला हवा. ब्राउन राइस, गव्हाचे पदार्थ, ज्वारी, बाजरा, डाळी यांमध्ये हेल्दी कार्बोहायड्रेट असतं.

Web Title: An extreme low carb diet may speed ageing and early death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.