थोड्या थोड्या वेळाने तहान लागणं घातक, या आजारांचा असू शकतो धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 10:03 AM2023-06-03T10:03:24+5:302023-06-03T10:03:41+5:30
Excessive Thirst: जर तुम्हालाही हा आजार असेल याला हलक्यात अजिबात घेऊ नका. लगेच डॉक्टरांना भेटून ब्लड टेस्ट करा.
Excessive Thirst: पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग पाण्यानेच बनला आहे. खासकरून उन्हाळ्यात पाणी जास्त प्यावं. पण काही लोक असे असतात जे दर तासाला सामान्यापेक्षा जास्त पाणी पितात. याचं कारण ते एक्ट्रीम थर्स्टचे शिकार आहेत. या मेडिकल कंडिशनला पोलिडिप्सिया असंही म्हटलं जातं. जर तुम्हालाही हा आजार असेल याला हलक्यात अजिबात घेऊ नका. लगेच डॉक्टरांना भेटून ब्लड टेस्ट करा. जेणेकरून वेळेवर उपाय केला जाऊ शकेल. जास्त तहान लागत असेल तर इतरही गंभीर आजारांचा संकेत असू शकतो.
डिहायड्रेशन Dehydration
हा काही कोणता आजार नाहीये, पण एक वाईट मेडिकल कंडिशन आहे. डिहायड्रेशन अशा स्थितीला म्हणतात जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते. अशात चक्कर येणे, डोकेदुखी होणे, उलटी येणे, डायरिया आणि कमजोरी अशा समस्या होऊ शकतात.
डायबिटीज Diabetes
जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा डायबिटीस होतो तेव्हा त्याना सहजपणे याबाबत समजत नाही. हे लक्षात ठेवा की, जास्त प्रमाणात तहान लागणे हा मधुमेहाचा संकेत असू शकतो. असं या कारणाने होतं कारण तेव्हा आपलं शरीर फ्लूइड्सना योग्यपणे रेग्युलेट करत नाही. जेव्हा खूप तहान लागत असेल तर ब्लड शुगर टेस्ट गरजेची आहे.
ड्राय माउथ Dry Mouth
ड्राय माउथ झाल्यावर थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याची ईच्छा होऊ लागते. तोंड तेव्हाच कोरडं पडतं जेव्हा याचं ग्लॅंड्स योग्यपणे सलाइवा म्हणजे लाळ बनवत नाही. या कारणाने व्यक्तीला हिरड्यांचं इन्फेक्शन आणि तोंडाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
एनीमिया Anemia
जेव्हा आपल्या लाल रक्तपेशी कमी झाल्या तर एनीमिया डिजीज होऊ शकतो. याला सामान्य भाषेत रक्ताची कमतरता होणे असं म्हणतात. अशा स्थितीत तहान जास्त लागते.