Eye Care Tips: कमी वयात चष्मा लागू नये म्हणून आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 07:00 AM2024-10-22T07:00:00+5:302024-10-22T07:00:02+5:30

Eye Care Tips: स्क्रीन टायमिंग वाढल्यामुळे लहान वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यावर उपाय म्हणून दिलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

Eye Care Tips: Include 'these' foods in your diet to avoid getting glasses at an early age! | Eye Care Tips: कमी वयात चष्मा लागू नये म्हणून आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा!

Eye Care Tips: कमी वयात चष्मा लागू नये म्हणून आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा!

जास्त स्क्रीन टाइम आणि आहाराची काळजी न घेतल्याने डोळ्यांचे खूप नुकसान होते. पूर्वी चाळीशी नंतर लागणारा चष्मा तीन -चार वर्षांच्या मुलांना लागत आहे. चष्मा लावणे हा त्यावर पर्याय असला तरी दृष्टी दोष दूर करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी डोळ्यांना आवश्यक असलेली पोषक द्रव्ये आहारात समाविष्ट करा. जाणून घेऊया डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणारे घटक!

स्क्रीन टाइम व्यतिरिक्त दृष्टी कमकुवत होण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये पौष्टिक आहाराची कमतरता देखील असू शकते. जर आवश्यक पोषक घटकांचा आहारात समावेश केला नाही तर (Foods For Good Eye Sight) तर डोळे हळूहळू कमकुवत होऊ लागतात.

त्यामुळे आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी (Eye Care Tips) आपण स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे आणि आपल्या आहाराची देखील काळजी घेतली पाहिजे. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी, व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्सने युक्त आहार घेणे आवश्यक आहे, तर चला अशा  फळांबद्दल आणि भाज्यांबद्दल (Diet To Improve Vision) जाणून घेऊया जे आपली दृष्टी सुधारण्यास मदत करतात.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?

गाजर- यात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या रेटिनाला मजबूत करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते. त्यामुळे कोशिंबीर, सॅलडमध्ये गाजराचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.

पालक - ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या अँटिऑक्सिडंटने समृद्ध, पालक डोळ्याच्या पेशींना नुकसान होण्यापासून संरक्षण करून दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करते. पालक शरीराच्या इतर भागांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा खात जा. 

रताळे- हा बीटा-कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे, जो वृद्धत्वाशी संबंधित समस्यांपासून डोळ्यांचे रक्षण करतो आणि त्यांना निरोगी ठेवतो. त्यामुळे रताळ्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

टोमॅटो- यात लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी असते, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

सिमला मिरची- यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या स्नायूंना मजबूत करते आणि डोळ्यांचा थकवा कमी करते.

केळी- पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए समृद्ध, केळी डोळ्यांना हायड्रेट ठेवते आणि दृष्टी सुधारते. त्यामुळे डोळ्यांवर ताण आणि डोळे कोरडे पडण्याची समस्या कमी होते.

ब्लूबेरी- यात अँटिऑक्सिडेंट असतात, जे डोळ्यांच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देतात आणि दृष्टी सुधारतात.

पेरू- व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असलेला पेरू डोळ्यांची दृष्टी राखण्यास मदत करतो.

ब्रोकोली- यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आढळतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि मोतीबिंदू रोखण्यास मदत करतात.

संत्रा- व्हिटॅमिन सीने भरपूर संत्र्यामुळे डोळ्यांच्या नसा निरोगी राहते आणि दृष्टीचे रक्षण होते.

याशिवाय दररोज डोळ्यांचा व्यायाम करणे, स्क्रीन टायमिंग कमी करणे, पुरेशी झोप घेणे, दुपारच्या कडक उन्हात सनग्लासेस लावणे आणि कामाच्या वेळी दर २० मिनिटांनी डोळ्यांना विश्रांती देणे यासारख्या उपायांचा अवलंब केल्यानेही डोळे निरोगी राहण्यास मदत होते. 

Web Title: Eye Care Tips: Include 'these' foods in your diet to avoid getting glasses at an early age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.