डोळे कमजोर होऊ देत नाहीत या 3 गोष्टी, कधीच लागणार नाही चष्मा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 10:32 AM2023-09-01T10:32:22+5:302023-09-01T10:32:59+5:30
Eye Care Tips : न्यूट्रिशनिस्ट डेल पिन्नॉक यांनी सांगितलं की, चांगला आहार आपलं पूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो. डोळ्यांची काळजी घेणंही आपल्यासाठी महत्वाचं आहे.
Eye Care Tips : लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, डाबिटीससारख्या समस्यांकडे बरेच लक्ष देतात. पण डोळ्यांच्या समस्यांकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. ज्याप्रकारे इतर आजारांसाठी लोक वेगवेगळे उपचार घेतात आणि डाएट घेतात, तसे डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. जर डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर डोळे कमजोर होऊ शकतात.
डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहाराची महत्वाची भूमिका असते. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पिवळे, गुलाबी आणि लाल रंगाची फळं आणि भाज्या खायल्या हव्यात. न्यूट्रिशनिस्ट डेल पिन्नॉक यांनी सांगितलं की, चांगला आहार आपलं पूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो. डोळ्यांची काळजी घेणंही आपल्यासाठी महत्वाचं आहे. अशात काही असे उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.
1) नारंगी फळं
नारंगी मिरची आणि रताळे दोन्हीही बीटा कॅरोटीन नावाच्या अॅंटी-ऑक्सिडेंट फायटोकेमिकलमुळे आपला नारंगी रंग मिळवतात. आपलं शरीर बीटा कॅरोटीनला व्हिटॅमिन ए मध्ये बदलतं. जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. एक्सपर्टनुसार, बीटा कॅरोटीन एएमडी, मोतिबिंदू आणि डायबिटीक रॅटिनोपॅथीचा धोका कमी करतं.
2) साल्मन
साल्मन फिशमध्ये प्रोटीन अधिक असतं. सोबतच यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि एस्टॅक्सॅन्थिन असतं जे वयांसंबंधी मॅक्यूलर डीजनरेशन, ग्लूकोमासारख्या स्थितींची धोका कमी करतात. जर तुम्हाला साल्मन पसंत नसेल तर एस्टॅक्सॅन्थिन तुम्हाला झिंग्यातूनही मिळू शकतं. ओमेगा 3 मॅकेरल, सार्डिन, अक्रोड आणि चिया सीड्समध्येही आढळतं.
3) टोमॅटो
टोमॅटोमध्ये लायकोपाइन नावाचं एक तत्व असतं, जे मोतिबिंदूच्या विकासाचा धोका कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे टोमॅटोचं सेवन सगळ्यांनी करायला हवं. याने शरीराला इतरही फायदे मिळतात.