कामाच्या ठिकाणी डोळ्यांची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या उपाय....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 03:01 PM2021-10-21T15:01:02+5:302021-10-21T15:02:54+5:30
कामाच्या ठिकाणी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
-डॉ. लोवाई एफ. दाऊदी , नेत्ररोग आणि लेसीक तज्ञ् , सैफी हॉस्पिटल, मुंबई
कामाच्या ठिकाणी डोळ्यांची दुखापत होणे फार सहज आहे. काम करतानाडोळ्यांची निगा राखण्याने दरवर्षी होणाऱ्या डोळ्यांच्या कित्येक दुखापतींपासुन वाचू शकतो. सामान्यपणे कामाच्या ठिकाणी डोळ्यांना काय काय इजा होतात. किंवा त्यावर काय उपाय करावे किंवा डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, हेच या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कार्यस्थळी होण्याऱ्या सामान्य जखमा या कारणांनी होवू शकतात:
- डोळ्यांत काही रसायन किंवा आणखी काही लहान कचरा (मातीचे कण , लोखंडाचे कण इत्यादी) जाणे.
- कॉर्नियाला ईजा होणे किंवा चीरा पडणे.
- ग्रीस किंवा तेलाचे शिंतोडे उडणे.
- वाफेमुळे भाजणे (कॉर्नियाला ईजा होणे)
- अल्ट्राव्हायोलेट किंवा इन्फ्रारेड रेडिएशन किरणांचे विकिरण
- डोळ्यांत धातु किंवा लाकड़ाचे तुकडे जाणे.
आरोग्य सेवा कामगार, प्रयोगशाळा आणि रखवालदार कर्मचारी आणि अन्यश्रमिकांना डोळ्यांच्या संपर्कातून होण्याचा अशा कामांपासून धोका अधिकअसतो. हे ह्या कारणांनी होवू शकते:
- डोळ्यांत रक्ताचे थेंब उडणे.
- कोणाच्या खोकल्याचा कफ उडणे किंवा दूषित बोटांनी किंवा इतरवस्तूंनी डोळ्यांना चोळ्याने.
कामगारांच्या डोळ्याला दुखापत होण्याचे हे दोन मुख्य कारणे आहेत:
- डोळ्यांची सुरक्षा उपकरणे न वापरणे
- काम करताना चूकीचे संरक्षण उपकरणे वापरणे
कामाच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचे अडथळे येतात हे लक्षात घेवून त्याअनुशंगाने तुम्ही डोळ्यांना संरक्षण देणारे या प्रकाराचे चष्मे वापरू शकता:
- बाजूने संरक्षण- जर तुम्ही अश्या ठिकाणी काम करता जिथे धुळीचे कण किंवा रसायन उडतात
- चष्मे (गॉगल्स)- रसायनशी निगडित कामे करित असाल तर
-खास- उद्देश्यांनी बनविले गेलेले चष्मे, गॉगल्स किंवा चेहर्याचे संरक्षणकरणारे फेस शील्ड किंवा हेल्मेट - जर तुम्ही घातक विकिरण(रेडिएशन) (वेल्डिंग, लेसर किंवा फायबर ऑप्टिक्स) चे काम करीत असाल तर
डोळ्यांची दुखापत रोखण्यासाठी या चार गोष्टी लक्षात ठेवा:
• कामाच्या ठिकाणी डोळ्यांचे संरक्षणाचे धोके ओळखा
• अशा अडथळ्यांना मशीन गार्ड्स, वर्क स्क्रीन्स, किंवा इतरअभियांत्रिकी नियंत्रक टूल्स वापरून काम करण्यापूर्वीच बाजूला सारा
• डोळ्यांना संरक्षण देणारी उपकरणे (गॉगल्स, फेस शील्ड किंवाहेल्मेट) वापरा
• डोळ्यांना संरक्षण देणारे चष्मे व्यवस्थित ठेवा आणि तुटले असतील तर लगेच बदला
ह्यांची खात्री बाळगा:
- सुरक्षा देणारे चष्मे व्यवस्थित बसले पाहिजे ज्या मुळे उत्तम संरक्षण लाभेल.
- डोळ्यांचे संरक्षण देणारे उपकरणे नेहमी स्वच्छ करायला हवे आणि व्यवस्थित वापरावे.
- खरचटलेले आणि घाणेरड्या उपकरणांनी दृष्टि बाधित आणि कमी होते, आणि अपघात होवू शकतात.
- काहीही आणीबाणी आढळली तर वैद्यकीय सेवा घ्या किंवा लगेच फर्स्टएड किट वापरा जेणे करुन डोळ्यांची दुखापत काही अंशी कमी होवू शकते.
अपघात झाले तर हे करा:
1. फर्स्ट एड जर डोळ्यात रसायन (एसिड किंवा अल्कली) गेल्यास
2. फर्स्ट एड वापरा जर डोळ्यात कण गेले असतील तर
3. फर्स्ट एड डोळ्याला मार लागला असेल तर
4. फर्स्ट एड वापरा जर डोळा किंवा पापणी भेदली गेली असेल किंवा चीरा पडला असेल लवकरात लऊकर डोळ्यांच्या डॉक्टरांशी सम्पर्क करा. त्यामुळे अनुचित उपचार मिळून, डोळ्याची दृष्टी वाचवू शकतो.