सावधान! पावसाळ्यात वेगाने पसरतोय Eye Flu; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:30 AM2023-07-26T11:30:52+5:302023-07-26T11:31:39+5:30

Eye Flu : कंजक्टिवाइटिस (Conjunctivitis) हा डोळ्यांना होणारा एक आजार असून याला डोळे येणं, डोळे लाल होणं किंवा पिंक आय असं देखील म्हटलं जातं. 

Eye Flu is increasing in delhi ncr know symptoms precaution treatment and home remedies | सावधान! पावसाळ्यात वेगाने पसरतोय Eye Flu; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव

सावधान! पावसाळ्यात वेगाने पसरतोय Eye Flu; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव

googlenewsNext

पावसाळ्यात डोळ्यांचं इन्फेक्शन अत्यंत वेगाने पसरतं. देशातील अनेक भागांसह दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टिवाइटिस (Conjunctivitis) हा डोळ्यांना होणारा एक आजार असून याला डोळे येणं, डोळे लाल होणं किंवा पिंक आय असं देखील म्हटलं जातं. 

'ही' आहेत आय फ्लूची लक्षणं

आय फ्लूमध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीचे डोळे लाल होतात. यासोबतच डोळ्यांतून सतत पाणी येत राहतं आणि सूज येते. त्यामुळे डोळ्यांनी स्पष्ट दिसू शकत नाही.

हा संसर्ग कसा पसरतो?

जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला या व्हायरसची लागण होऊ शकते. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंच्या संपर्कात आल्यास संसर्ग वाढवतो. याशिवाय, संक्रमित व्यक्ती खोकल्याने किंवा शिंकण्याने देखील संसर्ग पसरू शकतो.

आय फ्लूपासून असा करा बचाव
 
- वेळोवेळी हात स्वच्छ करा.
- सतत डोळ्यांना स्पर्श करू नका.
- आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा.
- वेळोवेळी डोळे धुवा.
- बाहेर जाणे जास्त महत्त्वाचे असेल तर चष्मा घालून जा.
- संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा.
- संक्रमित व्यक्तीचे बेड, टॉवेल किंवा कपडे वापरू नका
- टीव्ही-मोबाइलपासून अंतर ठेवा.

काय करू नये

डोळ्यांना संसर्ग झाल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.
यानंतर सांगितल्याप्रमाणे नियमित औषध घ्या.
टॉवेल, रुमाल यांसारख्या तुमच्या वस्तू कोणाशीही शेअर करू नका.
डोळ्यांना संसर्ग झाल्यास चष्मा वापरा, चुकूनही लेन्स घालू नका.
संसर्ग झाल्यानंतर घरीच रहा, बाहेर गेल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
बरं होण्यासाठी 5 ते 10 दिवस लागू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Eye Flu is increasing in delhi ncr know symptoms precaution treatment and home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.