डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी असा करा गुलाब पाण्याचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 06:38 PM2019-03-20T18:38:10+5:302019-03-20T18:38:35+5:30
गुलाब पाण्याचा वापर त्वचेसाठी करण्यात येत असून त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही करण्यात येतो. गुलाब पाण्याचा वापर त्वचेसोबतच डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतो.
गुलाब पाण्याचा वापर त्वचेसाठी करण्यात येत असून त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही करण्यात येतो. गुलाब पाण्याचा वापर त्वचेसोबतच डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतो. तसं पाहायला गेलं तर गुलाब पाणी एक नैसर्गिक क्लिंजरचं काम करतं. गुलाब पाण्याचा उपयोग अनेक फेस पॅक तयार करण्यासाठीही करण्यात येतो. पण गुलाब पाण्याचा उपयोग डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी कसा करण्यात येतो, जाणून घेऊया...
डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी गुलाब पाणी
आयुर्वेदिक उपायांमध्ये गुलाब पाण्याचा वापर डोळ्यांच इन्फेक्शन आणि अॅलर्जी दूर करण्यासाठी केला जातो. दिवसभर आपले डोळे अनेक गोष्टींच्या संपर्कात येतात. दिवसभर कम्प्युटर समोर बसून काम करणं, स्मार्टफोनचा वापर करणं, पर्यावरणाचं नुकसान, अशातच गुलाबपाणी तुमच्या डोळ्यांना आराम देतं आणि इन्फेक्शनही दूर करतं.
डोळ्यांसाठी गुलाबपाणी वापरण्याची पद्धत :
गुलाब पाण्यामध्ये कापूस भिजवा आणि बंद डोळ्यांवर 15 मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यामुळे सुटका होईल.
जर डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल किंवा डोळे लाल झाले असतील तर दोन- तीन थेंब गुलाब पाणी डोळ्यांमध्ये टाका. काही मिनिटांसाठी डोळे बंद करा. असं केल्याने डोळ्यांमधील धूळ आणि माती दूर होते.
डोळ्यांच्या आसपास गुलाब पाणी लावल्याने डार्क सर्कल्स दूर रहातात आणि डोळ्यांचा थकवाही दूर होतो.
गुलाब पाणी डोक शांत ठेवतं
गुलाब पाणी (Rose Water) डोकं शांत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच यामुळे चांगली झोप येण्यासाठी मदत होते. यामध्ये असलेले फ्लोवोनॉइडमुळे असं होतं. गुलाब पाणी अॅन्टी-डिप्रेसेंटच्या रूपामध्ये काम करतं. गुलाब पाणी डोळ्यांसाठी वापरणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
वेदना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं
पॅरासिटामॉल फारसं स्ट्रॉन्ग नसतं परंतु यामध्ये वेदना दूर करण्यासाठी काही खास तत्व असतात. ज्ये जखम भरून काढण्यासाठी मदत करतात. आता तुम्ही विचार करत असाल की, यामुळे डोळ्यांना काय फायदा होतो? यामुळे डोळ्यांना दिवसभराच्या थकव्यापासून आराम मिळतो. डोळ्यांवरील तणाव दूर करतो, त्यामुळे वेदनाही होत नाहीत.