कमी वयातच धुसर झाली असेल डोळ्यांची दृष्टी, चष्मा घालवण्यासाठी करा 'या' फळाचं सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 04:25 PM2024-11-04T16:25:35+5:302024-11-04T16:32:56+5:30
How to boast eye sight : तुम्हाला जर लागलेला चष्मा दूर करायचा असेल किंवा चष्मा लागूच द्यायचा नसेल तर एका फळाचं नियमितपणे सेवन करा. याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी धुसर होणार नाही.
How to boast eye sight : आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी वयातच अनेकांच्या डोळ्यांची दृष्टी धुसर होऊ लागते. काहींना जवळचं बरोबर दिसत नाही तर काहींना दूरचं दिसत नाही. अशात कमी वयातच डोळ्यांवर चष्मा लावून फिरावं लागतं. मात्र, तुम्हाला जर लागलेला चष्मा दूर करायचा असेल किंवा चष्मा लागूच द्यायचा नसेल तर एका फळाचं नियमितपणे सेवन करा. याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी धुसर होणार नाही. हे फळ म्हणजे अक्रोड.
अक्रोडचं सेवन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि इतर अनेक पोषक तत्व असतात. जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात.
१) ओमेगा- ३ फॅटी अॅसिड
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. जे डोळ्यांसाठी गरजेचं असतं. याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली होण्यास मदत मिळते.
२) अॅंटी-ऑक्सिडेंट्स
अक्रोडमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. जे डोळ्यांचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्याचं काम करतात.
३) व्हिटॅमिन ई
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा असतं, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तसेच मोतिबिंदू आणि वयानुसार डोळ्यांसंबंधी होणाऱ्या समस्या रोखण्यासही याने मदत मिळते.
४) ल्यूटिन आणि जॅक्सेंथिन
हे पिगमेंट्स डोळ्यांमध्ये आढळतात आणि उन्हापासून डोळ्यांची सुरक्षा करतात.
किती कराल सेवन?
अक्रोडचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करू शकता. दिवसातून किमान ४ ते ५ अक्रोड खावेत. हे तुम्ही दह्यासोबत किंवा सलादमधूनही खाऊ शकता.
अक्रोडच्या नियमित सेवनाने तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. मात्र, अक्रोड खाण्यासोबतच काही हेल्दी सवयी सुद्धा लावून घ्या. जसे की, पुरेशी झोप घेणे, स्क्रीन टाईम कमी करणे, डोळ्यांची नियमित स्वच्छता, बाहेर जाताना गॉगलचा वापर इत्यादी.
अक्रोड खाण्याचे इतर फायदे
- अक्रोडच्या नियमित सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. अशात तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते.
- अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला झोपही चांगली येते. याने चिंता आणि तणाव दूर करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर अक्रोड त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतं.