कोरोनामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ, 'हे' आजार इतके गंभीर की तुम्ही व्हाल कायमचे अंध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 12:38 PM2021-09-08T12:38:58+5:302021-09-08T12:44:43+5:30

कोरोना महामारीदरम्यान वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कॉम्प्युटर स्क्रीन समोर सतत बसल्याने दृष्टी खराब होते. तसेच डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

eye problems due to computer and mobile screen during covid, symptoms and remedies | कोरोनामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ, 'हे' आजार इतके गंभीर की तुम्ही व्हाल कायमचे अंध

कोरोनामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ, 'हे' आजार इतके गंभीर की तुम्ही व्हाल कायमचे अंध

Next

निरोगी आरोग्यासाठी शरीरात आवश्यक ती पोषकतत्त्व असणं जरुरी असते. शरीराच्या इतर भागांप्रमाणे डोळ्यांनाही निरोगी राहण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वांची गरज भासते. पौष्टिक आहार डोळ्यांच्या कार्यासाठी फार महत्त्वाचा असतो. पौष्टिक आहारातील पोषक घटक डोळ्यांना हानिकारक प्रकाशापासून वाचवतात. तसेच वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांपासून देखील सुरक्षित ठेवतात.

कोरोना महामारीदरम्यान वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कॉम्प्युटर स्क्रीन समोर सतत बसल्याने दृष्टी खराब होते. तसेच डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे की कोरडे डोळे, डोळ्यांचा ताण आणि थकवा, अंधुक दृष्टी, डोकेदुखी. शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्याच्या विचित्र सवयी, वारंवार खाणे हे देखील डोळ्यांच्या समस्यांना कारणीभूत ठरत असल्याचे सीनियर कंसल्टन्ट डॉ. विनीत सहगल यांनी सांगितले.

पोषक घटकांच्या कमतरतेमुळे येऊ शकतात ‘या’ समस्या
डोळ्यांना अनुकूल असणाऱ्या पोषक घटकांपैकी ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि झिंक सारखे घटक डोळ्यांच्या गंभीर आजारांचा धोका कमी करतात, ज्यामध्ये वाढत्या वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन आणि मोतीबिंदू यांचा समावेश आहे. व्हिटॅमिन एची कमतरता असलेल्या मुलांना अवॉइडेबल ब्लाइंडनेस तसेच अतिसार आणि गोवर यासारख्या गंभीर आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका जास्त असतो.

काय उपाय करता येतील?
डोळ्याच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटकांमध्ये काही पोषक घटक असे आहे की, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सुकामेवा यांमध्ये उपलब्ध असतात. योग्य आहाराव्यतिरिक्त, शारीरिक व्यायाम देखील मोतीबिंदू, कोरडे डोळे, ग्लूकोमा आणि इतर गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: eye problems due to computer and mobile screen during covid, symptoms and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.