डोळ्यांनी धुसर दिसत असेल तर रोज प्या 'हे' खास ड्रिंक, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:28 AM2024-07-29T10:28:27+5:302024-07-29T10:29:14+5:30

Drink for Eye sight : तुम्हाला जर धुसर दिसत असेल आणि लागलेला चष्मा दूर करायचा असेल तर एक खास उपाय घरीच करू शकता.

Eye sight boosting drink prescribed by a Nutritionist | डोळ्यांनी धुसर दिसत असेल तर रोज प्या 'हे' खास ड्रिंक, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

डोळ्यांनी धुसर दिसत असेल तर रोज प्या 'हे' खास ड्रिंक, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत!

Drink for Eye sight : जास्त वेळ टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप पाहिल्यामुळे डोळे कमजोर होतात. त्यामुले कमी वयातच चष्माही लागतो. जर एकदा का चष्मा लागला तर लोक तो दूर करण्याचा फार काही विचार करत नाही. अशात चष्मा आयुष्यभर लावावा लागतो. पण तुम्हाला जर धुसर दिसत असेल आणि लागलेला चष्मा दूर करायचा असेल तर एक खास उपाय घरीच करू शकता. न्यूट्रिशनिस्टने एका खास ड्रिंकने तुम्ही धुसर दिसण्याची समस्या दूर करू शकता. चला जाणून घेऊ हे ड्रिंक बनवण्याची पद्धत आणि याचे फायदे...

कसं बनवाल हे ड्रिंक?

1 चमचा तूप, चिमुटभर काळी मिरे पावडर घ्या. एका वाटामध्ये तूप आणि काळी मिरे पूड चांगली मिक्स करा. तूप आणि काळी मिऱ्याचं हे मिश्रण तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. तसेच तुम्ही एक ग्लास गरम पाण्यात टाकूनही याचं सेवन करू शकता.

या ड्रिंकचे फायदे

- यासाठी तुम्हाला शुद्ध तूपाचाच वापर करायचा आहे. तूपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के भरपूर असतं. जे डोळ्यांसाठी फार महत्वाचे आहेत. 

- डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए, सी आणि ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि झिंक असलेल्या फूड्सचं भरपूर सेवन करा. यासाठी गाजर, हिरव्या पालेभाज्या, मासे, ड्राय फ्रुट्स, आंबट फळाचं सेवन करा.

- डोळे हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्यावे.

किती दिवस प्याल हे ड्रिंक

या ड्रिंकचं सेवन तुम्ही 21 दिवस लागोपाठ करावं. काही दिवसातच तुम्हाला याचे फायदे दिसू लागतील.

डोळ्यांची एक्सरसाईज

- डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी नियमितपणे डोळ्यांचे व्यायाम करा. जसे की दूरच्या एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रीत करणं किंवा डोळे फिरवणे.

- 20-20-20 नियम फॉलो करा. दर 20 मिनिटांनी स्क्रीन बघण्यापासून ब्रेक घ्या. काही वेळासाठी हिरव्या झाडांकडे बघा.
 

Web Title: Eye sight boosting drink prescribed by a Nutritionist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.