डोळे चुरचुरताहेत? लाल झालेत? -जरा नीट पहा ते ‘बोलके’ झालेत!

By admin | Published: July 1, 2017 05:02 PM2017-07-01T17:02:59+5:302017-07-01T17:02:59+5:30

डोळे लाल होणं, चुरचुरणं हे नेहमीचंच म्हणत त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

Eyes are puzzling? Red made? Well, look it up! | डोळे चुरचुरताहेत? लाल झालेत? -जरा नीट पहा ते ‘बोलके’ झालेत!

डोळे चुरचुरताहेत? लाल झालेत? -जरा नीट पहा ते ‘बोलके’ झालेत!

Next

-पवित्रा कस्तुरे

जीवनसे भरी तेरी आंखे, मजबूर करे जीने के लिए.. असं आपल्याला कुणी म्हणो ना म्हणो. आपल्या जीवनात तरी आपले डोळे फार महत्वाचे आहेत. आणि इतरांना ते काही सांगो ना सांगो, इतरांना आपल्या नजरेची भाषा कळो ना कळो, आपल्याला मात्र तरी भाषा कळली पाहिजे. आपले डोळेही आपल्याशी बोलत असतात. पावसाळ्यात तर जरा जास्तच बोलतात. आपले डोळेही पुरेसे बोलके असतात. म्हणून आपण जरा त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यासाठी त्यांची भाषा कळली पाहिजे. ती कळण्यासाठी अर्थात स्वत:कडे लक्ष द्यायला पाहिजे. पण तेवढाही वेळ नसेल तर किमान डोळे दाखवत असलेली काही लक्षणं तरी पहा. आणि त्वरीत उपाय करा. तुम्हाला काही तक्रारी वारंवार होत असतील तर डोळ्याच्या डॉक्टकरांकडे जा.

१) डोळे वारंवार लाल होतात का? सतत कम्प्युटरवर काम केल्यानं, किंवा वाचल्यानं, टीव्ही पाहतात, आंघोळ झाल्यावर, पावसात भिजल्यावर? याकशाही पेक्षा किंवा यापैकी कुठलंही कारण नसताना जर डोळे लाल होत असतील तर डोळ्यांना त्रास होतोय हे समजून वेळीच डॉक्टरचा सल्ला घेणं उत्तम.

२) डोळ्यातून पाणी येतंय का? येत असेल तरी डोळ्याच्या डॉक्टरकडे जा.
३) डोळ्याला सकाळी उठल्यावर घाण येते, डोळ्यांची आग होते, पापण्या जड वाटतात का?
४) डोळ्यात सतत काहीतरी टोचतं का?

ही सारी लक्षणं दिसत असतील तर आपण त्वरित डॉक्टरकडे जायला हवं. पण त्याआधी घरच्या घरी काही गोष्टी करायला हव्यात.

१) डोळे पाण्यानं स्वच्छ आणि वारंवार धुवावेत.
२) स्वच्छ हातरुमाल वापरा.
३) चष्मा चांगला आहे का पहा, तो वारंवार स्वच्छ करा. पुसा.
४) मनानं औषधं घेवू नका.
५) जाहिरातीत दिसतात ते आयड्रॉप स्वत:च डोळ्यात टाकू नका.

Web Title: Eyes are puzzling? Red made? Well, look it up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.