प्रदुषणामुळे डोळ्यांची आग होतेय, आजच करा 'हे' घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 05:12 PM2022-11-04T17:12:52+5:302022-11-04T17:14:47+5:30
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात तर मोठ्या प्रमाणात प्रदुषण आहे. या विषारी हवेचा परिणाम आपल्या आरोग्यावर सतत होत असतो.
शहरातील हवा प्रदुषित होत चालली आहे हे आता आपल्यासाठी नवीन नाही. याला कारणीभूतही आपणच आहोत. बहुतेक विकसित शहरांना प्रदुषणाने वेढले आहे. वातावरणासंबंधी प्रत्येक अहवालात शहरांचे AQI म्हणजेच एअर क्वॉलिटी इंडेक्स धक्कादायक आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात तर मोठ्या प्रमाणात प्रदुषण आहे. या विषारी हवेचा परिणाम आपल्या आरोग्यावर सतत होत असतो. दरम्यान कामानिमित्त घराबाहेर पडणे गरजेचेच असल्याना शक्य तितकी काळजी घ्यायला हवी. प्रदुषणाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे डोळ्यांचे विकार जडणे.
प्रदुषणामुळे म्हणजेच हवेतील विषारी धुलिकणांमुळे डोळे जळजळ करत असतील तर त्वरित उपचार घेण्याची गरच आहे. विषारी हवेमुळे डोळे कोरडे पडतात नाहीतर कधीकधी सतत डोळ्यातून पाणी येते. अशावेळी लगेच वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम. बाहेर पडताना गॉगल घालून गेलात तर फायदा होईल.
स्क्रीनपासून राहा दूर
जर डोळ्यात सतत आग होत असेल, पाणी येत असेल तर हा स्मॉग चा परिणाम असू शकतो. सर्वात आधी तर मोबाईल, कॉम्प्युटर स्क्रीनपासून दूर राहणे गरजेचे आहे. यामुळे डोळे आणखीनच कोरडे पडतात. वैद्कीय सल्ल्यानुसार डोळ्यांसाठी ड्रॉप घेणे आवश्यक आहे.
सतत पाणी प्या
प्रदुषण किंवा कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन पासून बचाव करायचा असेल तर शरिरात पाण्याचे प्रमाण जास्त हवे. सतत हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे.यामुळे कोरड्या डोळ्यांची समस्या दूर होण्यास मदत होते.
थंड पाण्याने डोळे धुवा
बाहेरुन आल्यानंतर डोळ्यांना आराम देण्यासाठी थंड पाण्याने धुतले पाहिजेत. अनेकदा हात डोळ्यांना लावल्याने हाताचे जंतू डोळ्यात जातात. यामुळे अॅलर्जीची समस्याही उद्भवू शकते.
पोषक आहार घ्या
लिंबू पाणी, नारळ पाणी, ग्रीन टी, शीतपेये शरिरात जाऊन प्रदुषणाशी लढण्यास मदत करतात. तसेच हिरव्या भाज्या, फळे, सुकामेवा याचा आपल्या डाएटमध्ये अवश्य समावेश करावा. व्हिटॅमिन आणि अॅंटीऑक्सिडेंट्सने परिपूर्ण असा आहार घ्यावा.