फक्त मास्कच नाही तर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 11:15 AM2020-01-29T11:15:42+5:302020-01-29T11:32:01+5:30
कोरोना व्हायरल सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे.
कोरोना व्हायरस सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे लोकांनी हा आजार पसरण्याच्या भीतीने मासांहार करणं सोडलं आहे. चीनमधील हेल्थ एक्सपर्टसच्या म्हणण्यानूसार या आजाराचा व्हायरस हा एका व्यक्तीकडून इतर व्यक्तींकडे संक्रमित होत जातो. या व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोक सार्वजनीक ठिकाणी जाण्यासाठी खूप विचार करत आहेत. बाहेर जाताना तोंडाला फेसमास्क लावून वावरत आहेत.
जेव्हापासून कॅनडामध्ये कोरोना व्हायरसचा एक रूग्ण आढळून आला आहे तेव्हापासून लोक मास्त वापरत वावरत आहेत. कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी तज्ञ काय सल्ला देतात ते आपण आज जाणून घेणार आहोत.
तज्ञांच्यामते तुम्ही फेसमास्कचा वापर करून सर्जिकल मास्क वापरून कोरोना व्हायरसपासून बजाव करू शकता. याबाबत तज्ञ साशंक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्कचा योग्य ठिकाणी वापर करणं गरचेचं आहे. त्यावेळी तुम्ही दवाखान्यात जात असता त्यावेळी वेगवेगळे जंतू हवेच्या माध्यामातून तुमच्या शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्जिकल मास्कचा वापर करून तुम्ही आजारांपासून स्वतःला लांब ठेवू शकता. तर एकिकडे डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही N95 रेस्पिरेटर मास्क वापरत असाल तर जास्त प्रमाणात प्रोटेक्शन करता येऊ शकतं. N95 रेस्पिरेटर मास्कचा वापर करून तुम्ही एका मर्यादेपर्यंत गंभीर आजारांना रोखू शकता. इतर व्यक्तींच्या खोकण्यामुळे किंवा शिंकण्यामुळे होणारे इन्फेक्शन रोखता येऊ शकते.
मास्कचा वापर करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क लावत असताना कोणत्याही गोष्टीला स्पर्श होता कामा नये. जर तुम्ही दुसरा मास्क कॅरी करत असाल तर तुम्ही आधी त्याला हात लावत असता त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. कारण त्यावेळी मास्क जर हवेच्या संपर्कात येत असेल तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-धुळीच्या संपर्कात येताच जोरजोरात शिंका येऊ लागतात? वाचा काय आहे अॅलर्जीचं नेमकं कारण...)
असा पसरतो कोरोना
हेल्थ एक्सपर्टसच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरस इन्फेक्टेट व्यक्तीच्या खोकण्यामुळे आणि शिंकण्यामुळे होत असतो. त्यामुळे जर तुम्ही इन्फेक्टेड व्यक्तीच्या आजूबाजूला वावरत असाल तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता असते.
अशी घ्या काळजी
ऑरेंटो मेडिकल असोसिएशनच्या तज्ञांच्या म्हणण्यानूसार कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे तुम्ही आपले हात हॅण्डवॉशचा वापर करून स्वच्छ धुवा. तसंच कोणत्याही सामानाला स्पर्श केल्यास आधी हात स्वच्छ धुवा. सार्वजनीक ठिकाणी सामानाला हात लावल्यानंतर आणि ट्रेनमध्ये प्रवास करत असताना तसंच लोकांना भेटल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवा.( हे पण वाचा-सावधान! तरूण वयात केलेल्या 'या' चुका तुम्हाला आई होण्यापासून रोखू शकतात...)
जर तुम्हाला शारीरिक समस्या जाणवत असीतल किंवा थकवा आला असल्यास सार्वजनीक ठिकाणी न जाता आराम करा. कारण त्यावेळी तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होत असते. घरात आणि बाहेर स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा.