चेहऱ्यावरील हावभावांचा आपल्या भावनांवर होतो परिणाम - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:28 PM2019-04-15T12:28:27+5:302019-04-15T12:31:10+5:30
आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की, नेहमी हसत राहिल्याने अनेक समस्या दूर होतात. सतत हसत राहिल्याने मानसिक आरोग्यासोबतच शरीरही निरोगी राहण्यास मदत होते, असं देखील आपण ऐकत असतो.
(Image Credit : parenttoolkit.com)
आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की, नेहमी हसत राहिल्याने अनेक समस्या दूर होतात. सतत हसत राहिल्याने मानसिक आरोग्यासोबतच शरीरही निरोगी राहण्यास मदत होते, असं देखील आपण ऐकत असतो. आता या गोष्टीला संशोधकांनीही दुजोरा दिला आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, हसताना लोकं फार आनंदी असतात. हे सिद्ध करण्यासाठी अमेरिकेतील काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक संशोधन केलं. या संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल सायकॉलॉजिकल बुलेटिन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनात मागील 50 वर्षांचा डेटा तपासून त्यावर अभ्यास करण्यात आला की, खरचं चेहऱ्याच्या हावभावांचा त्यांच्याशी निगडीत भावनांशी संबंध आहे का?
अमेरिकेतील यूनिवर्सिटी ऑफ टेनेसीमध्ये पीएचडी करणारा विद्यार्थी निकोलस कोल्स यांने सांगितले की, पारंपारिक ज्ञानानुसार, थोडंस हसणंदेखील आपल्याला थोडसं का होईना आनंदी राहण्यास मदत करतं. पण याउलट तुम्हाला राग आल्यामुळे तुमची चिडचिडी देखील होत असते.
11 हजार लोकांना या संशोधनामध्ये सहभागी करण्यात आलं
कोल्स यांनी सांगितले की, मानसशास्त्रज्ञांनी जवळपास 100 वर्षांपर्यंत या विषयाला गांभीर्याने घेतलं नाही. याबाबत अनेक संशोधकांनी याबाबत वेगवेगळे विचार मांडले. 2016मध्ये हा वाद अगदी विकोपाला गेला. त्यावेळी 17 संशोधकांना थोडंसं हसणंदेखील माणसाला खूश होण्यासाठी पुरेसं असतं. हे सिद्ध करणं शक्य झालं नाही. त्यांनी सांगितले की, परंतु आम्ही कोणत्याही एका संशोधनाच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. मानसशास्त्रज्ञ 1970च्या सुरूवातीपासूनच यावर विचार करत आहेत. त्यामुळे आम्हाला सर्व परिणाम पाहून ते अभ्यासणं गरजेचं वाटलं. मेटा-अॅनालिसिस तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधकांनी 138 संशोधनांचा डाटा एकत्र केला. ज्यामध्ये जगभरातील 11 हजार लोकांना सहभागी करण्यात आले होते. संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, चेहऱ्याच्या हावभावांचा आपल्या भावनांवर थोडसा तरी परिणाम होतोच.
हसण्याचे अनेक फायदे :
- टेन्शन आणि डिप्रेशन कमी होतं.
- नॅचरल पेनकिलर म्हणून हसणं काम करतं.
- शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते.
- हसणं एखाद्या व्यायामाप्रमाणेही काम करतं.
- हसल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.
- चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे हसणं.
- आत्मविश्वास वाढविण्यासाठी
- सकारात्मक विचार वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं.
- हसणं तुम्हाला जीवनात निराश होऊ देत नाही.
टिप : वरील सर्व गोष्टी एका संशोधनातून सिद्ध झाल्या असून आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.