Fact Check : कोरोना संसर्ग झाल्यास तुरटीच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं बचाव होतो? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 03:43 PM2021-05-07T15:43:08+5:302021-05-07T15:50:07+5:30
Fact Check : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोक वेगवेगळ्या घरगुती उपायांचा वापर करत आहे.
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा गंभीर स्वरूप घेतलं आहे. संक्रमणच्या वाढत्या प्रकोपामुळे मोठ्या संख्येनं लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. यामुळे एकंदरच भयानक स्थिती पाहायला मिळत आहे. रोज लाखो लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोक वेगवेगळ्या घरगुती उपायांचा वापर करत आहे.
अशा परिस्थितीत विविध प्रकारचे घरगुती उपचारही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तशाच प्रकारे, एक व्हिडिओ आजकाल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, असा दावा केला जात आहे की, तुरटीच्या पाण्याचे सेवन केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येतो.
अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, तुरटीच्या पाण्याचे सेवन केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग रोखता येतो आणि यामुळे संक्रमित व्यक्तीला चांगले आरोग्यही मिळू शकते. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती असे सांगत आहे की, जेवणानंतर अर्धा ग्लास पाण्यामध्ये तुरटी फिरवावी. त्यानंतर या पाण्यानं गुळण्या केल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गापासून लांब राहता येतं.
कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
दरम्यान कोणत्याही आरोग्य तज्ज्ञाने तुरटीच्या पाण्याच्या सेवनाने कोरोना संक्रमण कमी होते. याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. म्हणून कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी अशा खोट्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे.
माहिती ब्युरोने (पीआयबी) वृत्ताची पडताळणी करण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेक टीम नावाचे एक 'फॅक्ट चेक युनिट' स्थापन केले आहे. कोरोना विषाणूशी संबंधित कोणत्याही बातम्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण त्याची संपूर्ण चौकशी करायला हवी. अन्यथा गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.